एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'हप्पू की उलटन पलटन' अद्भुत स्टार कलाकारांसोबत विनोदी ट्विस्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेमधील घरेलू कॉमेडी व मनोरंजनपूर्ण कथानकासह प्रेक्षकांना दर आठवड्याला नवनवीन मनोरंजन मिळत आहे. नुकतेच मालिकेमध्ये दबंग दुल्हनिया राजेश सिंगची भूमिका साकारणा-या कामना पाठकने सांगितले की, मालिकेमधील तिच्या पतीची भूमिका साकारणारा दरोगा हप्पू सिंग (योगेश त्रिपाठी) याचे कॉमेडीचा बादशाह गोविंदासोबत विलक्षण साम्य आहे आणि योगेशसोबत शूटिंग करताना नेहमी तिला गोविंदाजींची आठवण येते. आणि काय योगायोग पाहा.आगामी कथानक गोविंदाजींचा चित्रपट 'क्यूंकी मैं झूठ नहीं बोलता'मधूनच प्रेरित आहे, ज्यामुळे दरोगा हप्पू सिंग त्याच प्रकारच्या दुविधेमध्ये अडकला आहे. त्याला खरं, खोटं आणि माँ की कसम यांच्यामधून एकाची निवड करायची आहे.
कटोरी अम्माला (हिमानी शिवपुरी) नेहमीच तिचा मुलगा हप्पू आणि त्याच्या खोटे बोलण्याच्या सवयींबाबत चिंता आहे. त्याची ही सवय मोडून काढण्यासाठी ती हप्पूकडून कधीच खोटं न बोलण्याचे वचन घेते. ज्यामुळे तो विनोदी, विलक्षण व प्रतिकूल परिस्थतीमध्ये अडकून जातो. हप्पूच्या खरे बोलण्याने लोकांच्या भावना दुखावू लागतात. आता हप्पूने करावे तरी काय? या रोमांचक कथानकाबाबत सांगताना योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ''प्रामाणिकपणा सर्वोत्तम गुण आहे, या विश्वासासह आपण सर्व मोठे झालो आहोत. पण कधी-कधी खरे बोलल्यामुळे देखील संकटमय व विलक्षण स्थितीमध्ये अडकून जायला होते. आणि हप्पू सिंगच्या बाबतीत असेच काहीतरी घडले आहे.
आईला पुन्हा कधीच खोटं न बोलण्याचे वचन दिल्यानंतर तो विनोदी स्थितींमध्ये अडकून गेला आहे, ज्यामुळे त्याला मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. त्याच्या खरे बोलण्याने लोकांच्या भावना दुखावू लागतात आणि तो त्याने केलेल्या अपेक्षापेक्षाही अधिक संकटामध्ये सापडतो. अनेकदा आपण दुस-यांच्या भावना दुखावू नये किंवा भांडण होऊ नये म्हणून खरे बोलणे टाळतो. हा अत्यंत धमाल व मनोरंजनपूर्ण एपिसोड आहे, जेथे हप्पू मजेशीर स्थितींमध्ये अडकून जातो. पण महत्त्वाची बाब म्हणजे हप्पू किती वेळ कटोरी अम्माला दिलेल्या वचनाचे पालन करेल. पुढे काय घडते? हे जाणून घेण्यासाठी रसिकांनीही प्रचंड उत्सुकता आहे.