'हप्‍पू की उलटन पलटन' मालिकेला 2 वर्ष पूर्ण, कलाकरांनी असं केलं खास सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 04:51 PM2021-03-09T16:51:41+5:302021-03-09T16:55:16+5:30

'हप्‍पू की उलटन पलटन' मालिकेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.

'Haprapu Ki Ultan Paltan' serial completes 2 years | 'हप्‍पू की उलटन पलटन' मालिकेला 2 वर्ष पूर्ण, कलाकरांनी असं केलं खास सेलिब्रेशन

'हप्‍पू की उलटन पलटन' मालिकेला 2 वर्ष पूर्ण, कलाकरांनी असं केलं खास सेलिब्रेशन

googlenewsNext

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'ने दरोगा हप्‍पू सिंग (योगेश त्रिपाठी), त्‍याची पत्‍नी दबंग दुल्‍हनिया राजेश (कामना पाठक) आणि हट्टी आई कटोरी अम्‍मा (हिमानी शिवपुरी) यांचे घरगुती गैरसमज व विनोदी अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. या मालिकेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हप्‍पूच्‍या विनोदी चुका, राजेशचे विलक्षण प्रत्‍युत्तर आणि अम्‍माचा बुलंद अंदाज यांसह हे त्रिकूट प्रेक्षकांची मने जिंकत आहे.


कलाकार व टीमने केक कापत सेलिब्रेशन केलं.  मालिकेच्‍या कलाकारांपैकी एक योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्‍पू सिंग म्‍हणाला, ''निर्मात्‍यांनी हप्‍पूच्‍या संदर्भात कथा निर्माण करण्‍याचे ठरवले तेव्‍हा ती भूमिका अत्‍यंत उत्‍साहपूर्ण होती आणि मला याबाबत खूप आनंद झाला. प्रतिभावान टीमसोबतचा हा विलक्षण, पण घटनांनी भरलेला प्रवास राहिला आहे. आम्‍ही आजही आमचे पात्र योग्‍य असण्‍याचा सराव करत असताना मला सुरूवातीच्‍या दिवसांची आठवण येते. प्रेक्षक आम्‍हाला आमच्‍या मालिकेमधील नावांनी हाक मारतात तेव्‍हा आम्‍हाला अभिमानास्‍पद वाटते.''

 कामना पाठक म्‍हणाली, ''मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'ला इतरांपेक्षा खास बनवणारी बाब म्‍हणजे महिलांचे स्‍थान. हास्‍य व विनोदासह ज्‍याप्रमाणे महिला पात्रांना महत्त्व देण्‍यात आले आहे ते अत्‍यंत सुंदर आहे. राजेश ही जुडले जाता येईल अशी भूमिका आहे आणि ती एक प्रबळ महिला आहे, जी आपल्या कुटुंबाची काळजी घेण्‍यासोब‍त इतर कर्तव्‍ये देखील लीलया पार पाडते. मला या भूमिकेबाबत वर्णन करण्‍यात आले तेव्‍हाच मला समजले की ही भूमिका हिट ठरेल आणि मी त्‍वरित ही भूमिका साकारण्‍याला होकार दिला. आज, मला देशभरातील प्रेक्षकांकडून कौतुक मिळत असलेल्‍या या मालिकेचा भाग असण्‍याचा अभिमान वाटत आहे. प्रेक्षक अत्‍यंत दयाळू आहेत व पाठिंबा देत आहेत. मी आजीवन त्‍यांचे मनोरंजन करण्‍यास उत्‍सुक आहे.'' 

Web Title: 'Haprapu Ki Ultan Paltan' serial completes 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.