Join us

बाबांच्या वाढदिवशी हार्दिकने गिफ्ट केली महागडी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 09:29 IST

अभिनेता हार्दिक जोशीने वडिलांच्या वाढदिवशी त्यांना आलिशान कार गिफ्ट दिली आहे. या गाडीची मूळ किंमत लाखांच्या घरात आहे

'तुझ्यात जीव रंगला' फेम मराठमोळा अभिनेता हार्दीक जोशी हा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. हार्दीकने फार कमी काळात मराठी मनोरंजन विश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. हार्दीकने काही वर्षांपुर्वी अभिनेत्री अक्षया देवधरसोबत लग्न केलं. आता हार्दीकने एक अशी गोष्ट केलीय, जी ऐकून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल. हार्दीकने बाबांच्या वाढदिवशी त्यांना महागडी गाडी गिफ्ट केलीय.

हार्दीकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. यात त्याची पत्नी अक्षया देवधर,  त्याची आई आणि बाबा दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन हार्दीक लिहितो की, "Special Birthday gift for the special one, Happy birthday pappa, My XUV700" हार्दीकने बाबांच्या वाढदिवशी त्यांना महिंद्रा XUV700 ही गाडी गिफ्ट केली आहे. या गाडीची किंमत १४ ते २० लाखांच्या घरात आहे.

हार्दिकने बाबांसाठी केलेल्या खास गोष्टीमुळे सर्वजण त्याचं अभिनंदन करत आहेत आणि त्याच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. हार्दीकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, काही दिवसांपुर्वी तो 'नवरदेव B.sc Agri' या सिनेमात दिसला. याशिवाय हार्दीक सध्या स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिनय करतोय. अक्षया कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत नाही.

टॅग्स :हार्दिक जोशीअक्षया देवधरमहिंद्रा