Join us

'खरा नेता तोच..'; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हार्दिकची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 2:58 PM

Hardeek joshi: 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या खाली असलेल्या इर्शालवाडी येथे मोठी दुर्घटना घडली. बुधवार १९ जुलै रोजी डोंगराचा काही भाग कोसळला, या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८१ जण बेपत्ता आहेत.  ही घटना घडल्यानंतर सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या प्रशासन युद्धपातळीवर याठिकाणी बचावकार्य करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde) यांनीदेखील घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्यानंतर अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi) याने एक पोस्ट शेअर करत त्यांना सलाम केलं आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

काय म्हणाला हार्दिक?

 'रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली. ही बातमी मुख्यमंत्री साहेबांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले व स्वत: सर्व परिस्थिती आणि व्यवस्थापन बघितले. इतक्या तातडीने काम करणारे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची नक्कीच नोंद होईल,' असं तो म्हणाला.

पुढे तो म्हणतो, 'खरा नेता तोच, जो तळमळीने संकटकाळी धावून जातो, आपुलकीने विचारपूस करतो, धीर देतो आणि आपले उत्तरदायित्त्व समजून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता रस्त्यावर उतरलेल्या मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सलाम'

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हार्दिकने एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. त्याची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्याच्यासोबतच अमोल नाईक, माधव देवचाके, आदिती सारंगधर या कलाकारांनीही शिंदे गटात प्रवेश केला. 

टॅग्स :हार्दिक जोशीएकनाथ शिंदेरायगडभूस्खलनसेलिब्रिटी