Join us
Daily Top 2Weekly Top 5

साऊथच्या श्रीवल्ली-पुष्पावर भारी पडले राणादा-पाठकबाई; 'अंगारो सा'वर डान्स करत फॉलो केला ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 15:46 IST

राणादा-पाठकबाईंनी फॉलो केला ट्रेंड; अंगारो सा गाण्यावर डान्स करत श्रीवल्ली-पुष्पाला दिली तगडी टक्कर

'पुष्पा २' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पाप्रमाणेच पुष्पा २ सिनेमाचीदेखील क्रेझ पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमातील गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गाण्याची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या अंगारो सा या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. 'अंगारो सा' गाण्यावरील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बॉलिवूडबरोबरच मराठी कलाकारांनीही 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. 

आता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल असलेल्या राणादा आणि पाठकबाईंनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशीने पुष्पा २मधील अंगारो सा गाण्यावर डान्स केला आहे. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अक्षया आणि हार्दिक 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या गाण्याच्या हुक स्टेप्सही त्यांनी केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. साऊथच्या श्रीवल्ली आणि पुष्पावर मराठमोळी राणादा-पाठकबाईंची पुष्पा स्टाइल भारी पडल्याचं दिसत आहे. 

दरम्यान, अक्षया आणि हार्दिक 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे घराघरात पोहोचले. या मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. अक्षया आणि हार्दिक डिसेंबर २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकले. ऑनस्क्रीन राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकल्याने चाहतेही खुश होते. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. 

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीटिव्ही कलाकारपुष्पा