Join us

हर्षदा खानविलकर यांचं झी मराठीवर पुनरागमन, सोबतच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्रीही दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 10:02 AM

मालिकेच्या प्रोमोमध्ये आणखी एका अभिनेत्रीने लक्ष वेधलं ती म्हणजे...

झी मराठी वाहिनीवर लवकरच नवी मालिका सुरु होत आहे. 'लक्ष्मी निवास' असं मालिकेचं शीर्षक आहे. बऱ्याच वर्षांनी अभिनेत्री हर्षदा खानविलकर झी मराठी वाहिनीवर पुनरागमन करत आहेत. त्यांची मालिकेत मुख्य भूमिका आहे. तर त्यांच्या सोबतीला अभिनेते तुषार दळवीही आहेत. दरम्यान मालिकेच्या प्रोमोमध्ये आणखी एका अभिनेत्रीने लक्ष वेधलं ती म्हणजे पाठकबाई उर्फ अभिनेत्री अक्षय देवधर(Akshaya Deodhar).

हर्षदा खानविलकर (Harshada Khanvillkar) आणि तुषार दळवी (Tushar Dalvi) मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवास या भूमिकेत आहेत. या जोडप्याचं हक्काच्या घराचं स्वप्न आहे. मात्र मुलींची लग्न, इतर खर्च अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. प्रोमोमध्ये दोघंही एका गाडीवरुन जात असताना हक्काचं घर नक्की होईल असं एकमेकांना सांगत असतात. दरम्यान यावेळी एक फॅमिली फोटोही मध्येच झळकतो. यात मधोमध पाठकबाई बघायला मिळत आहेत. आता अक्षयाची मालिकेत नक्की काय भूमिका आहे हे लवकरच कळेल. सध्या नवीन मालिकेचा हा प्रोमो  व्हायरल होतोय.

हर्षदा खानविलकर यांचं बऱ्याच वर्षांनी झी मराठीवर कमबॅक पाहून इतर कलाकारांनीही कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच ही मालिका एका कन्नड मालिकेचा रिमेक असल्याचाही अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. आता मालिकेची गोष्ट नक्की काय असेल यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे.

टॅग्स :अक्षया देवधरझी मराठीटेलिव्हिजनमराठी अभिनेता