हर्षालीचे हरविले ते सोनाक्षीला गवसले,जाणून घ्या काय आहे ती गोष्ट?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 10:13 AM
‘मुस्कान’ ही नवी मालिका फेब्रुवारीच्या मध्यापासून प्रसारित होणार आहे.आई आणि तिची मुलगी यांच्यातील नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवलेल्या या मालिकेचा कथाभाग ...
‘मुस्कान’ ही नवी मालिका फेब्रुवारीच्या मध्यापासून प्रसारित होणार आहे.आई आणि तिची मुलगी यांच्यातील नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवलेल्या या मालिकेचा कथाभाग टीव्हीवरील नेहमीच्या सासू-सुनेच्या मालिकांपेक्षा अगदी वेगळा आहे.या मालिकेतील मुस्कानच्या भूमिकेसाठी हर्षाली मल्होत्राची निवड करण्यात आली होती.परंतु त्यामुळे हर्षालीलाचित्रपटांतील संभाव्य भूमिका गमवाव्या लागल्या असत्या आणि हर्षालीला चित्रपटातील भूमिकांवर लक्ष केंद्रित करायचे असल्याने तिने या मालिकेत भूमिका रंगविण्यास नकार दिला, असे बोलले जाते. त्यामुळे सोनाक्षी सावे या मुलीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.निर्मात्यांशी निकटच्या संपर्कात असलेल्या एका सूत्राने सांगितले, “आम्ही सोनाक्षीची तात्काळ निवड केली, कारण या सात वर्षांच्या मुलीत आम्हाला खूपच सुप्त क्षमता दिसली.ती एखाद्या प्रौढ आणि समंजस कलाकाराप्रमाणे अभिनय करू शकते आणि तरीही तिच्या चेह-यावरील निरागसता लपत नाही.या भूमिकेसाठी त्याची खूपच गरज होती.”अजून निरागस असलेली सोनाक्षी सेटवर धमाल करीत असते आणि आपल्या अभिनयगुणांची झलक दाखवीत असते.तिने यापूर्वी रंगभूमीवर भूमिका साकारल्या असून केवळ सात वर्षांची असूनही तिने अनेक मराठी नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.Also Read:‘मुस्कान’मध्ये प्रमुख भूमिकेत नेहा मर्दा!‘बालिका बधू’,‘डोली अरमानों की’ आणि अन्य मालिकांतील शक्तिशाली भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान प्राप्त केलेली अभिनेत्री नेहा मर्दा लवकरच पुन्हा टीव्हीच्या पडद्यावर दिसणार आहे.रश्मी शर्मा प्रॉडक्शन्स या संस्थेची निर्मिती असलेल्या नव्या मालिकेतील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी नेहाची निवड करण्यात आली आहे. आपल्या ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेनंतर निर्माती रश्मी शर्मा आता ‘स्टार प्लस’साठी नवी मालिका तयार करीत आहे. या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळविली होती आणि ती तब्बल सात वर्षे या वाहिनीवरून प्रसारित होत होती. रश्मी आता एका अगदी वेगळ्याच विषयावरील (एका सेक्स वर्करच्या जीवनावरील) कथानक असलेल्या मालिकेच्या निर्मितीत व्यस्त आहे.या मालिकेला यापूर्वी ‘तवायफ’ आणि ‘मीना बाजार’ अशी शीर्षके देण्यात आली होती; परंतु आता या मालिकेचे ‘मुस्कान’ असे नामकरण करण्यात आले आहे.