'मिर्झापूर'मध्ये डिम्पी पंडितची भूमिका साकारणाऱ्या हर्षिता गौरने तिच्या पर्सनल लाईफविषयी सांगितलं आहे. हर्षिता २०१७ मध्ये डिप्रेशनची शिकार झाली होती. त्या काळात तिच्याकडे काहीही कामही नव्हतं. हर्षिताने ब्रुटसोबत खास संवाद साधला. त्यावेळी तिने यावर भाष्य केलं आहे.
"माझा शो 'मिर्झापूर' खूप हिट झाला होता. मला वाटलं होतं की मला धर्मा प्रॉडक्शन आणि यशराज यांच्या ऑफर्स मिळू लागतील, पण तसं झालं नाही. मी दिल्लीहून मुंबईत आले तेव्हा माझ्या हातात काम होतं. मी काम केलं. २०१४ ते २०१७ च्या मध्यापर्यंत मी दररोज काम करायचे. मी दिवसभरात १४ ते २० तास काम करायचे."
"जेव्हा शो संपला तेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं. मला कामाशिवाय घरी बसण्याची सवयही नव्हती. एक महिना गेला, 2 महिने गेले, सात महिने असेच गेले. माझं ७-८ किलो वजन कमी झालं होतं. मला कोणतीही ऑफर आली नाही. मी चार दिवस घराबाहेर पडले नाही. माझी आंटी मला भेटायला घरी आली, तेव्हा मी खूप रडले होते"
"मी थेरपी सेशन्सला जाऊ लागले. मला खूप फायदा झाला. तोपर्यंत मला माहीत नव्हतं की मी डिप्रेशनची बळी आहे. मग मधल्या काळात मला साऊथचा चित्रपटही मिळाला, पण आठवडाभर शूटिंग केल्यानंतर त्यांनी मला नकार दिला. मी मुंबईला परतले. मग हळूहळू गोष्टी रुळावर येऊ लागल्या. आता मी ठीक आहे" असं हर्षिता गौरने म्हटलं आहे.