तुम्ही कधी श्रेया बुगडेच्या सख्या बहिणीला पाहिलंत?, दोघींंमध्ये आहे जबरदस्त बॉन्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 07:00 AM2022-02-25T07:00:00+5:302022-02-25T07:00:02+5:30

अनेकवेळा श्रेया आपल्या बहिणीसोबतचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Have you ever seen Shreya Bugde's sister? There is a strong bond between the two. | तुम्ही कधी श्रेया बुगडेच्या सख्या बहिणीला पाहिलंत?, दोघींंमध्ये आहे जबरदस्त बॉन्डिंग

तुम्ही कधी श्रेया बुगडेच्या सख्या बहिणीला पाहिलंत?, दोघींंमध्ये आहे जबरदस्त बॉन्डिंग

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

तिच्या पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यासाठी चाहते ही उत्सुक असतात. श्रेया अनेकवेळा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. अनेकवेळा श्रेया आपल्या बहिणीसोबतचे बरेचसे फोटो  इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

श्रेयाच्या मोठ्या बहिणीचं नावं तेजल आहे. श्रेया आणि तेजलची चेहरेपट्टी अगदी सारखी असून त्यांच्या केवळ उंचीत फरक असल्याचे दिसून येते. श्रेया बहीण तेजलसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. या फोटोंमधून दोघींमधले बॉन्डिंग ही दिसून येते. श्रेयाने शेअर केलेल्या बहिणीसोबतच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. श्रेया बुगडेची मोठी बहीण तेजल ही देखील दिसायला तिच्या इतकीच सुंदर आहे.

वेळ मिळताच श्रेया बहिणीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसते. दोघांच्याही आवडी-निवडी अगदी सारख्याच आहेत. श्रेया आपल्या अदा, स्टाईल, लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. फॅशन आणि स्टाईलमध्ये श्रेयाप्रमाणे तेजलही तितकीच सजग आहे.

Web Title: Have you ever seen Shreya Bugde's sister? There is a strong bond between the two.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.