Join us

'आई कुठे काय करते' मालिकेतील अरूंधतीचा नवा लूक पाहिलात का?, फोटोची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 18:35 IST

अरूंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा नवा लूक शेअर केला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेला कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील अप्पा, आई, अरूंधती, अनिरूद्ध, यश, अभिषेक, ईशा आणि गौरी अशा सर्वच पात्रांना प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. नुकतेच या मालिकेत अरूंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा नवा लूक शेअर केला आहे. 

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडिया इंस्टाग्रामवर खूप सक्रीय आहे आणि या माध्यमातून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर स्टोरीवर फोटो शेअर केला आहे. ज्यात तिचा नवा लूक पहायला मिळतो आहे.

या फोटोत ती मेकअप रुममध्ये बसलेली दिसते आहे. त्यामुळे तिचा हा लूक मालिकेतील आगामी भागांमध्ये पहायला मिळतो की इतर कोणत्या प्रोजेक्टमध्ये, हे अद्याप समजू शकलेले नाही.

'आई कुठे काय करते' मालिकेत यश आणि गौरीच्या साखरपुड्याची लगबग पहायला मिळते. दरम्यान अनिरुद्धचा भाऊ अविनाशनेदेखील १५ वर्षांनंतर समृद्धी बंगल्यात पाऊल ठेवले आहे. वैचारिक मतभेदांमुळेच अविनाशने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हसतं खेळतं कुटुंब दुभंगणार हे कळल्यावर त्याची पावलं पुन्हा एकदा घराकडे वळली आहेत. इतकेच नाही तर तो अनिरूद्धला घरातल्या लक्ष्मी जाऊ देऊ नकोस असेही सांगताना दाखवले आहे. अनिरुद्ध अरुंधतीच्या नात्याची वीण उसवल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबाला मानसिक आधाराची गरज आहे. अविनाश कुटुंबाचा आधार होईल का? त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं वळण येणार हे आगामी भागांमधून स्पष्ट होईल.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका