Join us

'तो ही कोणाच्या तरी प्रेमात पडलाय'; रेश्माची पोस्ट नक्की कोणासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:45 IST

Reshma shinde: रेश्माने शेअर केलेल्या फोटोपेक्षा तिने दिलेल्या कॅप्शनची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

'रंग माझा वेगळा' या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. उत्तम अभिनयाच्या जोरावर रेश्माने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत येत असते. रेश्मा सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे ती कायम तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

अलिकडेच रेश्माने इन्स्टाग्रामवर तिचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती साडी नेसून पावसात मनसोक्त भिजत आहे. विशेष म्हणजे पावसाचे थेंब अंगावर पडल्यानंतर तिला कवितेच्या काही ओळी सुचल्या ज्या तिने कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत.

'आज पावसाला देखील, मस्त रंग चढलाय.. जणु तो ही कोणाच्या तरी, प्रेमात पडलाय…', असं कॅप्शन रेश्माने या फोटोला दिलं आहे. तिचा हा फोटो आणि कॅप्शन पाहिल्यावर तिची सहकलाकार अनघा भगरे हिनेदेखील त्यावर कमेंट केली आहे. 

दरम्यान, रेश्माच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. इतकंच नाही तर तू सुद्धा कोणाच्या प्रेमात पडलीयेस का? असा प्रश्नही नेटकऱ्यांनी तिला विचारला आहे. त्यामुळे सध्या तिची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

टॅग्स :रेश्मा शिंदेटेलिव्हिजनसेलिब्रिटीपाऊस