​दिल है हिंदुस्तानीमध्ये पुनित पाठक झळकणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2017 07:47 AM2017-01-23T07:47:38+5:302017-01-23T13:17:38+5:30

दिल है हिंदुस्तानी हा एक सिंगिंग रिअॅलिटी शो असून या कार्यक्रमात विविध स्पर्धक आपल्या मधुर आवाजातील गाणी रसिकांसमोर सादर ...

In the heart of Hindustani, the role of the reader will be seen | ​दिल है हिंदुस्तानीमध्ये पुनित पाठक झळकणार या भूमिकेत

​दिल है हिंदुस्तानीमध्ये पुनित पाठक झळकणार या भूमिकेत

googlenewsNext
ल है हिंदुस्तानी हा एक सिंगिंग रिअॅलिटी शो असून या कार्यक्रमात विविध स्पर्धक आपल्या मधुर आवाजातील गाणी रसिकांसमोर सादर असतात. या कार्यक्रमात करण जोहर, बादशहा, विशाल रावजियानी परीक्षकाची भूमिका बजावत आहेत.
सगळ्याच संगीत रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक आपल्याला केवळ गाणी गातानाच दिसतात. पण दिल है हिंदुस्तानी या रिअॅलिटी शोचे फॉरमॅटच काहीसे वेगळे आहे. यात प्रेक्षकांना या स्पर्धकांची गाणी ऐकायला मिळणार आहेत. पण त्याचसोबत या स्पर्धकांचे नृत्यकौशल्यदेखील पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात स्पर्धकांना आपल्या गाण्याला अनुसरून नृत्यदेखील सादर करावे लागणार आहे. या कार्यक्रमात 11 स्पर्धक अंतिम टप्प्यात प्रवेश करत असल्याने प्रेक्षकांना या कार्यक्रमात हे वेगळेपण पाहायला मिळणार आहे. या स्पर्धकांना नाचण्यासाठी नामवंत नृत्यदिग्दर्शक पुनित पाठक मदत करणार आहे. पुनितनेदेखील एका रिअॅलिटी शोद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर त्याने अनेक रिअॅलिटी शोमध्ये मेन्टर आणि परीक्षकाची भूमिका बजावली. तसेच एबीसीडी ः एनीबडी कॅन डान्स या चित्रपटातही त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. आता दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमाद्वारे तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांना तो नृत्य शिकवणार आहे. गाणे गाताना नृत्य कशाप्रकारे सादर करायचे, प्रॉप्सचा वापर कशाप्रकारे करायचा या गोष्टी तो त्यांना सांगणार आहे. 
इतर सिंगिंग रिअॅलिटी शोपेक्षा काहीतरी वेगळे प्रेक्षकांना दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे हे वेगळेपण प्रेक्षकांना आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. पुनितचा कार्यक्रमात प्रवेश झाल्यानंतर दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमातील स्पर्धक चांगले गायक असण्यासोबत चांगले डान्सरदेखील असल्याची प्रेक्षकांना नक्कीच जाणीव होणार आहे. 





Web Title: In the heart of Hindustani, the role of the reader will be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.