Join us

Cannes 2019 : दीपिका, कंगनासोबत हिना खानही दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 13:58 IST

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019ची सगळीकडे चर्चा आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खान हिने ही कान्समध्ये रेड कार्पेटवर  दिमाखदार अंदाजात एन्ट्री घेतली आहे.

ठळक मुद्देहिनाने परिधान केलेल्या लव्हेंडर कलरच्या ड्रेसमध्ये दिसली

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019ची सगळीकडे चर्चा आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खान हिने ही कान्समध्ये रेड कार्पेटवर  दिमाखदार अंदाजात एन्ट्री घेतली आहे. हिनाने परिधान केलेल्या लव्हेंडर कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

हिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. हिनाने पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच एंट्री केली आहे. 

स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत कोमोलिका या खलनायिकेची भूमिकेत हिना खान दिसली होती. मात्र त्यानंतर तिने या सिरिअरला बाय बाय केले.‘कसौटी जिंदगी के’ मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर ती बॉयफ्रेंड रॉकी जायसवालसोबत कान्ससाठी रवाना झाली. लाईन्स सिनेमातून ती बॉलिवूड मध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. तिचा या सिनेमातील लूकदेखील आऊट झाला आहे.

हा चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट आहे. यात हिना एका स्वतंत्र बाण्याच्या मुलीची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाची कथा ९० च्या दशकातील काश्मिरवर आधारित आहे.

हुसैन खान दिग्दर्शित या चित्रपटाची कथा राहत काजमी आणि शक्ती सिंह यांनी लिहिलीय. हिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहु’ म्हणून अधिक ओळखतात. बिग बॉस 11’ आणि ‘खतरों के खिलाडी सिझन 8’मध्येही ती सहभागी झाली होती.

टॅग्स :हिना खानकान्स फिल्म फेस्टिवल