दीडशेहून अधिक सिनेमात आपल्या अभिनयानं आणि सौदर्यानं हेमामालिनी यांनी रसिकांवर जणू काही मोहिनी घातलीय. वर्षानुवर्षे ड्रीमगर्लचं हेच सौंदर्य आणखी खुलत चाललंय. हेमा मालिनी सिनेमात झळकत नसल्या तरी अधून मधून छोट्या पडद्यावर त्यांची झलक पाहायला मिळते. नुकत्याच इंडियन आयडल कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात हेमा मालिनी खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. एरव्ही कधीच त्यांना अशा प्रकार रडतांना पाहिले नसेल.
पहिल्यांदाच हेमा मालिनी यांचे हे रुप पाहायला मिळाले. हेमा मालिनी यांनी रडतांना पाहून रसिकांच्याही डोळ्यात पाणी आले असेल. हेमा मालिनी यांची मुलगी इशा देवोलचा एक व्हिडीओ कार्यक्रमात दाखवण्यात आला. यावेळी इशा देवोेलने हेमा मालिनी यांना कुटुंब आणि काम दुहेरी जबाबदारी सांभाळताना कशी दमछाक व्हायची याविषयी सांगितले. हेमा मालिनी यांनी मुलं झाल्यानंतर आपले काम सुरुच ठेवले होते.
सकाळी मुलांना घरी सोडून शूटिंगला जावे लागायचे. शूटिंग आटोपून घरी आल्यानंतर हेमा मालिनी संपूर्ण वेळ आपल्या दोन्ही मुलींना द्यायचे. अर्थात हेमा मालिनी यांना त्यांच्या आई वडिलांची साथ लाभली. आई विषयी इतकं भरभरुन कौतुक करतानाचे पाहून हेमा मालिनी यांनाही भरुन आले. इशा देओलचे आई वरील प्रेम ऐकून हेमा मालिनी ऑन कॅमेरा भावूक झाल्या होत्या.
हेमा मालिनी या हरहुन्नरी आणि अष्टपैलू अशा नायिका असल्यासोबतच रिअल लाईफमध्ये त्या प्रेमळ आईसुद्धा आहेत. इशा आणि आहाना या दोन्ही लेकींसह हेमा मालिनी यांचं एक वेगळं आणि घट्ट नातं आहे. ब-याचदा हेमा आपल्या लेकींसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना पाहायला मिळतात.
इंडियन आयडलमधील सगळ्याच स्पर्धकांनी हेमा मालिनी यांच्यासमोर एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स दिले. ‘ए दिल-ए-नादां’ आणि ‘जूठे नैना बोले’ या गीतांवरील अंजलीचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहून सगळे परीक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले आणि त्यांनी तिचे खूप कौतुक केले.