फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. काल १४ फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला. कलाकारांनीही आपल्या पार्टनरसोबत फोटो शेअर करत 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा दिल्या. तर कोणी पहिल्या व्हॅलेंटाईनची आठवण काढली. अभिनेत्री हेमांगी कवीनेही नवऱ्यासोबत फोटो शेअर करत पहिल्या 'व्हॅलेंटाईन डे' चा किस्सा सांगितला. तिची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होत आहे.
हेमांगी कवी मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. याशिवाय ती समाजातील प्रश्नांवर नेहमीच रोखठोक मत शेअर करत असते. यामुळे तिचे सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होत असतात. 'व्हॅलेंटाईन डे' चे निमित्त साधत हेमांगीने पहिलं गिफ्ट काय मिळालं तो किस्सा सांगितला आहे.
हेमांगीने पहिला फोटो बोटातील अंगठीचा पोस्ट केला आहे तर दुसरा फोटो तिने नवऱ्यासोबतचा शेअर केला आहे.
हेमांगी लिहिते, 'हे माझं पहीलं व्हॅलेंटाईन गिफ्ट. १४ फेब्रुवारी २००७! मुलुंडच्या पिझ्झा हटमध्ये साजरा केला होता पहीला वहीला व्हॅलेंटाईन डे. आयुष्यात पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला होता… नाही…त्याने खाऊ घातला होता.हीच माझी त्यादिवशीची propose ring होती आणि पुढे जाऊन हीच माझी engagement ring ही झाली.
खरंतर Propose तर करून झालं होतं. मी हो ही म्हणून झालं होतं. पण लग्नाच्या आधी साखरपुडा करायचाच असतो म्हणून लग्नाच्या काही तासांपुर्वी साखरपुड्याचे कपडे घालून एकमेकांना अंगठी घालण्याची विधीपुर्वक औपचारिक्ता पार पाडली. पण साखरपुड्याची अंगठी म्हणून मी हीच घालणार हे आधीच सांगितलं होतं. कशाला हवी उगाच दुसरी अंगठी! (अशी समजूतदार बायको मिळायला भाग्यच लागतं हो )तेव्हा बोटात असलेली तीच अंगठी काढून एका नव्या feeling सह माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पुन्हा माझ्या बोटात घातली. मी त्याला त्याच्यासाठी बनवलेली अंगठी घातली आणि झाला आमचा साखरपुडा!
तेव्हापासून आजतागायत ही माझ्या बोटात आहे.आम्ही एकमेकांना उगाचच काहीही gift करत नाही कामाच्याच गोष्टी gift करतो. दिवस ही साजरा होतो. गरज ही भागते आणि आठवण ही राहते.आजही आम्ही असच काहीतरी खरेदी करणार आहोत. तुम्हीही करा!Happy Valentine's Day from us to you!प्रेम दिनाच्या सर्वांना प्रेममय शुभेच्छा!
हेमांगीचा हा पहिल्या 'व्हॅलेंटाईन डे' चा किस्सा नक्कीच खास आहे. दोघांच्याही कायम लक्षात राहण्यासारखा आहे.