Join us

"हिंदीत काम का करत नाही?", हेमांगी कवीने समीर चौघुलेंचा 'तो' व्हिडिओ शेअर करत सांगितलं कारण, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 13:20 IST

हेमांगी कवीने शेअर केलेला समीर चौघुलेंचा व्हिडिओ चर्चेत, म्हणाली, "माझं हिंदी..."

अभिनयाबरोबर स्वभावातील बोल्डनेस आणि बिनधास्तपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. नाटक, मालिक आणि चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारत हेमांगीने मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. हेमांगी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्टबद्दल हेमांगी पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. 

हेमांगीच्या अशाच एका पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम का करत नाही? या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना दिलं आहे. हेमांगीने या व्हिडिओत पुढे महाराष्ट्राची हास्यजत्रेतील समीर चौघुलेंचा एका स्किटमधील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत समीर चौघुले तुटक हिंदी बोलतना दिसत आहेत.

हेमांगीने या व्हिडिओला "हे सत्य घटनावर आधारित नाही", असं कॅप्शन दिलं आहे. "समीर चौघुले तू वेडा आहेस", असंही हेमांगीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

हेमांगी नुकतीच 'ताली' या सुश्मिता सेनच्या वेब सीरिजमध्ये झळकली होती. एका जाहिरातीत तिने क्रिकेटर युवराज सिंहबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. लवकरच ही जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमांगीने युवराजबरोबरचे फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली होती. 

टॅग्स :हेमांगी कवीमराठी अभिनेतासमीर चौगुले