Join us

म्हणून मनवीर गुर्जरला हॉस्पिटलमध्ये करावे लागले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2017 4:52 AM

बिग बॉस विजेता मनवीर गुर्जरच्या फॅन्सची काळजी वाढवणारी एक बातमी आहे. बिग बॉसच्या घरातून विजेता म्हणून बाहेर पडल्यानंतर एकामागून ...

बिग बॉस विजेता मनवीर गुर्जरच्या फॅन्सची काळजी वाढवणारी एक बातमी आहे. बिग बॉसच्या घरातून विजेता म्हणून बाहेर पडल्यानंतर एकामागून एक वादात सापडणारा मनवीर गुर्जर  दोन ते तीन दिवसांपूर्वी तापाने फणफणला होता. त्यामुळे त्याला तात्काळ  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.बिग बॉसच्या घरात मनवीर गुर्जरने शांत आणि संयमी वागणुकीने सा-यांची मनं जिंकत सीझनचे विजेतेपद पटकावलं. वादाशी मनवीरचा अपवादाने सामना झाला. मात्र जितका वादग्रस्त तो त्या घरात ठरला नाही त्याहून कित्येक पटीने अधिक वादग्रस्त तो घरातून विजेता म्हणून बाहेर आल्यावर ठरला आहे. मनवीर वादात सापडला तो त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे. मनवीर विवाहित असल्याचे समोर आले. इतकंच नाही तर त्याची तीन वर्षाची मुलगी असल्याचेही उघड झाले.त्यामुळे नवा वाद निर्माण झाला.कारण बिग बॉसच्या घरात असताना आपण अविवाहित असल्याचं मनवीर सांगत होता. आपल्याला लग्न करायचे नसून त्यासाठीच घर सोडले होते असंही तो आपल्या बिग बॉसच्या घरातील सहका-यांना सांगायचा. त्यामुळे यावरुनच नवा वाद निर्माण झाला होता. हा वाद शमतो ना शमतो तोच त्याच्याविरोधात एक एफआयआर दाखल करण्यात आली होती.आता मनवीरच्या आजारपणाचे आणि तापाचे कारण हाच वाद तर नाही ना.कारण याच वादामुळे गेल्या दिवसांपासून मनवीर तणावात असल्याचे बोलले जात होते.त्याला अशक्तपणाही जाणवत होता. या सगळ्या कारणामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.आता मनवीरची तब्येत सुधारत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.