Join us

​हाय फिव्हर... डान्स का नया तेवरमध्ये आलिया भट्टने सादर केला या सगळ्यांसोबत डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 3:43 AM

हाय फिवर...डान्स का नया तेवर हा रिअॅलिटी शो सुरुवातीपासूनच यशाच्या शिखरावर आहे. स्पर्धकांची असामान्य कामगिरी आणि वेगवेगळ्या पाहुण्या परीक्षकांची ...

हाय फिवर...डान्स का नया तेवर हा रिअॅलिटी शो सुरुवातीपासूनच यशाच्या शिखरावर आहे. स्पर्धकांची असामान्य कामगिरी आणि वेगवेगळ्या पाहुण्या परीक्षकांची उपस्थिती यामुळे प्रेक्षकांना हा कार्यक्रम नक्कीच खिळवून ठेवतो. या कार्यक्रमाचा एक खास भाग नुकताच चित्रीत करण्यात आला.आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या अत्यंत गुणी जोडीने हाय फिव्हर... डान्स का नया तेवर या रिअॅलिटी शोमध्ये मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सेलिब्रेशनमध्ये पूर्णतः बुडालेल्या आलिया भट्टने 'राझी' या चित्रपटात आपल्या आईसोबत काम करतानाचा अनुभव यावेळी शेअर केला. सेटवरील सर्व मातांसोबत नृत्य करत तिने सर्वांची मने जिंकून घेतली. तिचे विचार व्यक्त करताना आलिया म्हणाली, “मदर्स डे हा माझ्यासाठी असा एक दिवस आहे, ज्या दिवशी मला मदर्स डेची भरपूर शुभेच्छा पत्रे पाहायला मिळतात. पण, मला असे वाटते की मदर्स डे हा फक्त एका दिवसात साजरा करण्याचा उत्सव नसून तो दररोज साजरा व्हायला हवा. आम्ही नेहमीच या दिवसाकडे इतर दिवसांप्रमाणेच पाहतो. आपल्याला आपल्या आईसाठी वेळ काढायलाच हवा. मला नाही वाटत की आई आपल्यासाठी जे काही करते त्यासाठी एखादा दिवस आणि एखाद्या उत्सवाचे मूल्य पुरेसं ठरेल.”मातृदिन साजरा करतानाचे स्पेशल सरप्राईज म्हणून हाय फिव्हरच्या टीमने सर्व बालस्पर्धकांच्या मातांना सेटवर आमंत्रित केले होते. या आनंददायी सेलिब्रेशननंतर सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सगळ्याच स्पर्धकांच्या मातांनी आलिया आणि विकी यांना सगळ्या मातांनी आपल्यासोबत नृत्य करण्याची विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला परीक्षकांनी देखील मान दिला. मातांसोबत नृत्य करताना त्यांना उद्देशून आलिया भट्ट फारच छान बोलली. ती म्हणाली, "या सगळ्या मदर इंडिया आहेत. सगळ्याच मातांना आपण मानाने सलाम करायला हवा.''सगळ्या मातांना मानवंदना देणारा हाय फिव्हर... डान्स का नया तेवरचा नवा भाग आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. Also Read : Raazi Movie Review : एक हृदयस्पर्शी कथा !