Join us  

हिना खानने पुन्हा केले बोल्ड फोटोशूट,कॅमे-यात कैद झाल्या हॉट पोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:27 PM

काही काम मिळत नाहीये म्हणून हिना खान आता फक्त फोटोशूट करण्यात बिझी असल्याचे म्हणत युजर्स तिच्यावर राग व्यक्त करताना दिसतायेत.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलमधील अक्षरा म्हणजेच हिना खानने नुकतेच एक फोटोशूट केलेय. यामध्ये हिना  व्हाईट कलरच्या स्ट्रेपलेस शॉर्ट जंपसूटमध्ये दिसतेय.हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे घराघरांमध्ये पोहचली तब्बल एकाच मालिकेत तिने 8 वर्ष काम केले आहे. त्यानंतर ती  'खतरों के खिलाडी' सिझन 8 आणि 'बिग बॉस 11' या शोमध्येही झळकली होती.  असे म्हटले जात होते की, हिना खान त्या  सिझनमध्ये सर्वाधिक महागडी कंटेस्टंट होती.तिला एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये मानधन मिळायचे. आता सध्या ती कोणत्याच टीव्ही सीरियलमध्ये काम करत नाही.त्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत ती सध्या फोटोशूट करताना दिसते. मात्र सोशल मीडियावर  तिचे काही निवडक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.तिचे फोटो पाहून चाहते तिच्या या फोटोंचे कौतुक करताना दिसले तर काही तिच्यावर टीका करताना बघायला मिळत आहे.नुकतेच हिना खानने बोल्ड फोटोशूट केले आहे.फोटोज पाहून यूजर्सने तिला ट्रोल करणे सुरु केले आहे.एका यूजरने लिहिले - 'आता राखी सावंत सारखे वागणे सुरु झालेय. काही काम मिळत नाहीये म्हणून हिना खान आता फक्त फोटोशूट करण्यात बिझी असल्याचे म्हणत युजर्स तिच्यावर राग व्यक्त करताना दिसतायेत.

हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारली होती. 'अक्षरा' या भूमिकेमुळे हिना खानला प्रचंड लोकप्रियता मिळाली.मात्र मालिकेत आलेल्या नवीन ट्रॅकमुळे अक्षरा ही भूमिका काहीशी दुर्लक्षित होत असल्याचे हिनाला वाटत होते. त्यामुळे तिने या मालिकेतून एक्झिट घेत 'खतरों के खिलाडी 8'व्या पर्वात दमदार एंट्री केली होती.

रिअॅलिटी शोमध्ये नशीब आजमवल्यानंतर आता हिनाकडे सध्या पाहिजे तसे काम नसल्यामुळेच  फोटोशूट करत असते.या फोटोशूटमुळेच हिना खानचा एरव्ही कधीही न पाहिलेला बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहयला मिळत आहे.हिनाचा अवतार घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. 

टॅग्स :हिना खान