Hina Khan Rocky Jaiswal Love Story: हिना खान(Hina Khan) आणि रॉकी जैस्वाल (Rockey Jaiswal)यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे सर्वांनाच माहीत आहे. रॉकी पहिल्यांदा चर्चेत आला जेव्हा तो बिग बॉस 11 च्या एका एपिसोडमध्ये दिसला आणि नॅशनल टीव्हीवर त्याने हिनाला प्रपोज केलं होतं. 2009 मध्ये हिना खान(Hina Khan)ने स्टार प्लस शो ये रिश्ता क्या कहलाता है मधून पदार्पण केले. याच शोमध्ये रॉकी सुपरवायझिंग प्रोड्यूसरही होता. हिना आणि रॉकीची भेट 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या सेटवर झाली. हिनाबद्दल बोलताना रॉकीने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघे पहिल्यांदाच सेटवर भेटलो होतो. रॉकीने पुढे सांगितले की हिना कामासाठी समर्पित आहे, ही गोष्ट त्याला सर्वात जास्त आवडली.
2014 मध्ये हिना खान(Hina Khan) आणि रॉकी जैस्वाल यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. हिनाने २०१६ मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेला रामराम केला. याच वर्षी हिना खतरों के खिलाडी 8(Khatron Ke Khiladi 8)मध्ये दिसली होती.
2018 मध्ये हिनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, 3 वर्षांपासून ती लग्नाचा विचार करू शकत नाही. रॉकी 2021मध्ये म्हणाला होता अनेक वर्षे झाली आम्ही सोबत आहोत. आम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत. लग्नाला अजून बराच वेळ आहे असे आम्हाला वाटते. सध्या आम्हा दोघांनाही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
जेव्हा रॉकी(Rockey)ने बिग बॉसच्या घरात हिनाला प्रपोज केले तेव्हा तो म्हणाला होता – तुला माहिती आहे की आम्ही खूप वेळ एकत्र घालवला आहे. तुझ्याशिवाय मी जी वेळ पाहिली आहे, त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. बिग बॉस संपताच, कृपया माझ्यासाठी सगळा वेळ दे. आय लव्ह यू. रॉकीने जेव्हा प्रपोज केले तेव्हा दोघांचेही धर्म वेगळे असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय या नात्याला मान्यता देतील का असा प्रश्न सर्वांना पडला होता. एका मुलाखतीत रॉकीने सांगितले होते की, या नात्याला दोघांच्या कुटुंबीयांनी मान्यता दिली आहे.