टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ, फोटो ती शेअर करत असते. आता हिनाने वडिलांसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हिना वडिलांवर रागावलेली दिसतेय. कारण काय तर, हिनाच्या वाढत्या खर्चांमुळे त्रासलेल्या वडिलांनी तिचे क्रेडिट व डेबिट कार्ड बंद केले आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हिना व तिच्या वडीलांचे संभाषण आहे. वडिल हिनाला बचतीचा सल्ला देत आहेत.
‘माझ्याजवळ कोणतेही डेबिट, क्रेडिट कार्ड नाहीयेत, तुम्ही माझे सर्व कार्ड ब्लॉक केले,’ असे हिना वडिलांना म्हणते. यावर उत्तर देताना वडील तिला बचतीचा सल्ला देतात. ब्लॉक केले नाहीत तर बंद केले आहेत. लॉकडाउनची वेळ आहे. अशात पैसे बचतीकडेही लक्ष दिले पाहिजे. जेवढा पैसा जमा करू शकतेस तेवढा कर, असे वडिल तिला म्हणत आहेत.
आता मी शॉपिंग कसे करू? आता तर मी एक कप कॉफीही खरेदी करू शकणार नाही, असे हिना व्हिडीओत म्हणते. यावर, कॅश घे, मी देतो. मी तुला कॉफीसाठी दररोज 200 रूपये देईन आणि बाकी खर्चासाठीही काही पैसे देईन, असे वडील म्हणतात. हिनाचा हा व्हिडीओ तूर्तास खूप व्हायरल होतोय.हिना खान अलीकडे ‘बिग बॉस 14’मध्ये दिसली होती. स्पेशल गेस्ट म्हणून ती ‘बिग बॉस 14’मध्ये दिसली होती.
‘बिग बॉस 14’मध्ये दोन आठवडे राहण्यासाठी हिना खानला तगडी रक्कम मिळाली होती. रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी हिना खानला 72 लाख देण्यात आले. हिना खान शिक्षणासाठी श्रीनगरहून दिल्लीत आली. 2009 मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. खरे तर हिनाला एअर होस्टेस बनायखे होते. यासाठीच ती मुंबईत आली होती. मुंबईत तिने एअर होस्टेस कोर्सही ज्वाईन केला होता. मात्र याचदरम्यान तिला मलेरिया झाला आणि ती ट्रेनिंग अॅकेडमी ज्वाईन करू शकली नाही. एक दिवस मैत्रिणीला भेटण्यासाठी हिना ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवर गेली. योगायोगाने तिथे आॅडिशन्स सुरु होते. हिनाने गमतीगमतीत आॅडिशन दिले आणि काय आश्चर्य, या मालिकेच्या लीड रोलसाठी तिची निवड झाली. यानंतर हिनाने कधीच मागे वळून बघितले नाही.