Join us  

हिना खानने केमोथेरपीपूर्वी एका अवॉर्ड शोमध्ये लावली होती हजेरी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली - 'पहिल्या केमोच्या अगदी आधी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 10:01 AM

हिना खान हिने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिला स्तनांच्या कर्करोगाचं (Breast Cancer) निदान झालं आहे. हिना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर उपचार सुरू असल्याचं तिनं सांगितलं. आता हिना खानची नवी पोस्ट चर्चेत आली आहे.  कॅन्सरशी  कशाप्रकारे लढा देत आहे, या प्रवासावर नुकतंच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

हिना खान हिने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं "ही अवॉर्ड नाईट.. या दिवशी मला माझ्या कॅन्सरबद्दल माहिती होती. पण विचार करून तो दिवस नॉर्मल करण्याचा निर्णय घेतला. याच दिवशी माझ्यासाठी सर्व काही बदललं. आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक टप्प्याची ती एक सुरुवात होती. आपण ज्यावर विश्वास ठेवतो, आपण तेच बनतो. मी हे आव्हान एक संधी म्हणून स्वीकारलं आहे. ज्याद्वारे मी स्वतःला बदलू शकेन".

हिना खानने पुढे लिहिले, ''मी माझ्याकडे फक्त सकारात्मकता ठेवणार आहे. मी स्वतःसाठी हे सर्व सामान्य करण्याचा विचार केला आहे. माझ्यासाठी...माझे काम महत्त्वाचे आहे. माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी प्रेरणा, आवड आणि कला. मी झुकणार नाही. माझ्या पहिल्या केमोच्या अगदी आधी मला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणा. मी प्रत्येकाला आवाहन करते की जीवनातील सर्व अडचणी स्वीकारुन त्यांना सामान्य रुप द्या. त्यानंतर तुमचे ध्येय ठरवा आणि  ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ते कितीही कठीण असलं तरी. कधीही मागे हटू नका'. हिनाच्या या पोस्टरवर कमेंट करत चाहत्यांसह सेलिब्रिटींनी हिनाच्या धाडसाचे कौतुक केलं आणि तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हिना खान ही ३ ब्रेस्ट कॅन्सर या गंभीर आजाराची ट्रिटमेंट घेत आहे. या आजारावर मात करण्यासाठी मजबूत, दृढ, निश्चय आणि पूर्ण प्रयत्न करत आहे. हिना खानने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर ती 'कसौटी जिंदगी की' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. 'बिग बॉस', 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. हिनाने अनलॉक, डॅमेज या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. शिवाय लवकरच ती 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :हिना खानसेलिब्रिटीबॉलिवूडटेलिव्हिजनसोशल मीडियाकर्करोग