Join us

करिअरमध्ये पहिल्यांदाच नर्व्हस झाली हिना खान, या गोष्टीमुळे मिळाला आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 6:30 AM

कोमोलिकाच्या रुपात हिना खानला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आपल्या आकर्षक मादक सौंदर्याच्या जोरावर कोमोलिका प्रेक्षकांना पुन्हा एकवार आपल्या प्रेमात पाडण्यात यशस्वी होईल अशी या मालिकेच्या टीमला खात्री होती.

'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अक्षराच्या रुपात घराघरांत पोहोचलेली हिना आता स्टायलिश व्हॅम्पच्या रुपात दिसत आहे. हिना खानला आजही तिचे चाहते अक्षरा बहु याच नावाने जास्त ओळखतात. त्यामुळे आता त्याच साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या निर्णयामुळेच तिने ये रिश्ता....मालिका सोडत आव्हानात्मक कामे स्विकारली. मालिकेनंतर ती रिअॅलिटी शोमध्ये झळकली. 'बिग बॉस 11' आणि 'खतरों के खिलाडी सिझन 8' मध्येही सहभागी झाली होती. त्यानंतर आता ती 'कसौटी जिंदगी की' मालिकेत कोमोलिका भूमिका साकारत आहे. 

कोमोलिकाच्या रुपात हिना खानला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आपल्या आकर्षक मादक सौंदर्याच्या जोरावर कोमोलिका प्रेक्षकांना पुन्हा एकवार आपल्या प्रेमात पाडण्यात यशस्वी होईल अशी या मालिकेच्या टीमला खात्री होती. मात्र ही भूमिका साकारणे खुद्द हिनासाठी खूप आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे. हीच भूमिका काही वर्षापुर्वी उर्वशी ढोलकियाने साकारली होती. त्यामुळे कुठेतरी तुलना होणार हे माहिती होते. कोमोलिकाच्या रोलविषयी ती म्हणाली,  'एकता कपूरच्या वतीने मला पहिला कॉल आला, तेव्हा मी हैराण झाले होते. कारण एकतासमोर माझ्या तोंडून आवाजच निघाला नाही. मलाच कोमोलिकाच्या रोलसाठी का निवडले हा माझा तिला पहिला प्रश्न होता. ती म्हणाली, तुझ्यात खलनायिका साकारण्याचे पोटँशिअल आहे. अतिशय नर्व्हसही होते, पण एकताने माझ्यावर विश्वास दाखवला.

 'आजवर लोकांनी मला संस्कारी सून, मुलीच्या भूमिकेत बघितले. मग आता चांगली खलनायिका म्हणून त्यांनी मला का बघू नये? सुरुवातीला माझी द्विधामनःस्थिती होती, पण आता माझा निर्णय योग्य होता, याचा मला विश्वास असल्याचे तिने म्हटले आहे.' तसेच मला माझा  कोमोलिकाचा लूक अत्यंत आवडला असून मला स्वत:ला इतकं ग्लॅमरस कधीच वाटलं नव्हतं. कोमोलिकाचं नवं रूप हे फॅशन जगतात नवा पायंडा ठरणार याची पूर्ण खबरदारी एकताने घेतली आहे, याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही असेही तिने सांगितले.” 

टॅग्स :हिना खान