Join us

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला चोरट्यांनी लुटलं! हल्लेखोरांनी गैरवर्तन करत केली मारहाण, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:41 PM

गौरव सरीन (Gaurav Sareen) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे.

Gaurav Sareen: गौरव सरीन (Gaurav Sareen) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. 'उडान', 'कृष्णा चली लंदन' या मालिकेतून गौरव सरीन प्रसिद्धीझोतात आला. या मालिकांमुळे त्याच्या भलामोठा चाहतावर्ग निर्माण झाला. नुकतीच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गौरवला परदेशात काही हल्लेखोरांनी मारहाण करत लूटमार केल्याची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. 

गौरव सरीने त्याच्या अधिकृत इनस्टाग्राम अकाउंवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याद्वारे इस्तंबुलमध्ये त्याच्यासोबत काही अज्ञात व्यक्तींनी गैरवर्तन केल्याचं त्याने म्हटलंय. 

पोस्टद्वारे अभिनेत्याने दिली माहिती

गौरवने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची अवस्था पाहून चाहते देखील चिंतेत आहेत. सुजलेले डोळे, त्याखाली काळसर डाग अशी त्याची अवस्था पाहायला मिळतेय. 

यापोस्टमध्ये अभिनेत्याने लिहलंय, "काल रात्री माझ्यासोबत एक भयानक प्रसंग घडला. इस्तंबुल येथील ग्रॅंड बाजार जवळच्या परिसरात काही टोळक्यांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्याकडे असलेल्या सामान ते घेऊन गेले. अभिनेत्याच्या म्हणण्यानूसार या घटलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर त्याला सर्वातआधी एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आला. या घडल्याप्रकाराची कोणीही दखल घेतली नसल्याने गौरवने इस्तंबुल येथील पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे".

टॅग्स :टिव्ही कलाकारगुन्हेगारीसोशल मीडिया