श्रृती-शब्बीर खेळणार धीरज-श्रध्दाबरोबर होळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 5:42 AM
‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ ही मालिका आणि त्याचेच एक उपकथानक असलेली ‘कुंडली भाग्य’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीच्या ...
‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ ही मालिका आणि त्याचेच एक उपकथानक असलेली ‘कुंडली भाग्य’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीच्या असून हिंदी मनोरंजनाच्या क्षेत्रात त्या सध्या अग्रस्थानी आहेत. अभी (शब्बीर अहलुवालिया) आणि प्रज्ञा (श्रृती झा) यांची प्रेमकथा असो की प्रज्ञाची बहीण प्रीता (श्रध्दा आर्य) हिचे करण (धीरज धूपर) आणि ऋषभ (मनित जौरा) यांच्याशी असलेले संबंध असो, या दोन्ही मालिकांच्या कथानकांतील कलाटण्यांनी प्रेक्षकांनामालिकेत गुंगवून ठेवले आहे. आता होळीचा सण उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना या दोन्ही मालिकांचा दोन तासांचा एक विशेष भाग सादर होणार असून त्यात या दोन्ही मालिकांतील प्रमुख कलाकार एकत्र येऊन होळी साजरी करणार आहेत. त्यांच्यातील धडधडत्या प्रेमसंवेदनेने ते टीव्हीचा पडदा उजळून टाकणार आहेत.होळीनिमित्त भांग प्यायल्यावर तिच्या नशेच्या अंमलाखाली ‘कुंडली भाग्य’मधील करण आणि प्रीता परस्परांविषयी असलेले प्रेम व्यक्त करणार आहेत. त्यांच्या या प्रेमाच्या कबुलीचा प्रसंग अतिशय सुरेख आणि हलक्याफुलक्या पध्दतीने व्यक्त करण्यात आला आहे. ‘कुमकुम भाग्य’मधील अभी आणि प्रज्ञा हेही होळीचा सण इतरांसाठी संस्मरणीय करतील. होळीनिमित्त पारंपरिक नृत्याबरोबरच लोकप्रिय आणि ठसकेदार गाण्यांच्या तालावर रंगांची उधळण करीत केलेल्या नृत्यामुळे या भागाच्या रंजकतेत वाढच झाली आहे.होळीनिमित्त प्रसारित होणार््या या विशेष भागानिमित्त मनीत जौरा म्हणाला, “असे विशेष भाग म्हणजे ‘झी टीव्ही’ वाहिनीवरील इतर कार्यक्रमांतीलकलाकारांची प्रत्यक्ष भेट होण्याची उत्तम संधी असते. अशा भागांमध्ये आम्हाला प्रेक्षकांना काहीतरी वेगळी आणि नवी कामगिरी सादर करता येते. रोजच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी झालेल्या चित्रीकरणामुळे मनही ताजंतवानं होतं. होळीनिमित्त ‘कुमकुम भाग्य’च्या टीमबरोबर काम करण्याचा अनुभव फारच छान होता. होळी हा मौजमजेचाच उत्सव असल्याने या विशेष भागाच्या चित्रीकरणावेळी आम्ही खूप धमाल केली आणि काही खास पक्वान्नही खाल्ली. शब्बीर हा खरोखरच एक रॉकस्टार आहे आणि श्रृती ही अप्रतिम अभिनेत्री आहे. हा एकत्रित भाग चित्रीत करताना आम्ही सर्वांनी खूपच धमालमस्ती केली. प्रेक्षकांनाही हा होळीचा महासंगम विशेष भागनक्कीच आवडेल आणि ते आमच्यावर यापुढेही असंच प्रेम करीत राहतील, अशी आशा आहे.”