Join us

“तुमच्यासाठी काय पन” आणि “आज काय स्पेशल” मध्ये रंगणार होळी स्पेशल भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 9:12 AM

 कलर्स मराठीवरील तुमच्यासाठी काय पन या कार्यक्रमामध्ये दर आठवड्यामध्ये प्रेक्षकांना काहीना काहीतरी वेगळे बघायला मिळते. या होळी आणि रंगपंचमी ...

 कलर्स मराठीवरील तुमच्यासाठी काय पन या कार्यक्रमामध्ये दर आठवड्यामध्ये प्रेक्षकांना काहीना काहीतरी वेगळे बघायला मिळते. या होळी आणि रंगपंचमी विशेष आठवड्यामध्ये प्रेक्षकांना “रंग महाराष्ट्राचा” या संकल्पनेवर विनोदवीरांची तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या कलाकारांचा कलाविष्कार बघायला मिळणार आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होळी आणि रंगपंचमी कशी साजरी केली जाते हे देखील बघायला मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका तुमच्यासाठी काय पनचा होळी विशेष भाग “रंग महाराष्ट्राचा”  तसेच आज काय स्पेशल कार्यकर्मामध्ये देखील होळी – रंगपंचमी विशेष भाग रंगणार आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होळी कशी धुमधडाक्यात साजरी होते हे तुमच्यासाठी काय पनच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. अकोला येथील बंजारा समाज मध्ये होळी खूप जोश्यात साजरी केली जाते. तसेच कुडाळ येथील शिवदास म्हस्के आणि त्यांचे सुपुत्र यांनी चित्रकथी सादर केली. चिपळूणहून आलेल्या ग्रुपने नमन तर मालवण येथी ओमप्रकाश यांनी यक्षिणी सादर केले. ईतकेच नसून कार्यक्रमामधील विनोदवीरांनी गौवळण, चाळीतली रंगपंचमीची धम्माल मस्ती, सादर केली आहे. यामधील लक्ष वेधून घेणारा आणि सगळ्यात वेगळाप्रकार म्हणजे “लोकलकला” सादर केली. म्हणजेच लोककले मध्ये वेगवेगळे प्रकार असतातजसे भारुड, गौवळण तसेच लोकलमध्ये देखील असेच वेगवेगळे प्रकार सादर होतात भजन, भारुड जे स्कीटच्या रुपात विनोदवीरांनी सादर केले आहे. ही सगळी धम्माल मस्ती बघायला प्रेक्षकांना नक्कीच मज्जा येणार आहे यात शंका नाही.“आज काय स्पेशल” कार्यक्रमामध्ये अगदीच पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. कार्यक्रमामध्ये पाहुण्यांनी होळी विशेष पदार्थ बनविले पुरणाची पोळी, एक वेगळा पदार्थ वाटाणा पोहा करंजी, नारळाची पोळी.