Join us

परदेशात भारतीय संस्कृतीचे दर्शन; कथ्थक नृत्यशैलीचे बोल कानावर पडताच भारावले आदेश बांदेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 2:35 PM

'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

Aadesh Bandekar Video : 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 'दार उघड बये दार उघड' म्हणत सुरू झालेला त्यांचा प्रवास 'होम मिनिस्टर'पर्यंत येऊन पोहचला आहे. महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भावजी प्रेक्षकांचे लाडके बनले. आदेश बांदेकर वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त परदेश दौरे तसेच किंवा अन्य महत्वाच्या कामांसाठी ते बाहेरगावी भेटी देत असतात. त्या दरम्यान घडलेले किस्से, अनुभव ते सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 

सध्या आदेश बांदेकर 'खेळ मांडियेला' या कार्यक्रमानिमित्त अमेरिकेला गेले आहेत. अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया येथील कार्यक्रम आटोपून भावजी तिथे त्यांच्या मित्राच्या निवास्थानी वास्तव्यास आहेत.  तिथे गेल्यानंतर आदेश बांदेकर यांना आलेला अनुभव त्यांनी व्हिडीओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिथे पोहचताच परदेशात त्यांच्या मित्राची पत्नी अमेरिकन स्रियांना शास्रीय नृत्याचे धडे देत असल्याचं त्यांना समजलं. सातासमुद्रापार परदेशात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडल्यामुळे आदेश बांदेकर भारावले आहेत. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंवरून आदेश बांदेकर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अमेरिकेतल्या वेस्ट ग्रो येथील मित्राच्या घराची झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये बांदेकर म्हणतात, "अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया येथील कार्यक्रम संपवून आता आम्ही वेस्ट ग्रो या परिसरात माझा मित्र समर्थ जोशी याच्या घरी आम्ही आलो आहोत. त्याचबरोबर या परिसरात येताच अचानक भारतीय परंपरागत कथ्थक नृत्याशैलीचे बोल आमच्या कानावर पडले".

पुढे ते म्हणाले, "अमेरिकेत राधिका जोशी या कथ्थकचे क्लासेस घेतात. आपली पंरपरा संस्कृती जतन करत कथ्थकचं मार्दर्शन करून त्या अमेरिकेतील महिलांना प्रशिक्षण देतात. शिवाय या व्हिडीओतून त्यांनी अमेरिकेत शास्त्रीय नृत्याची कला आत्मसात करायची असेल तर राधिका जोशी यांना संपर्क साधा,असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. ". शिवाय या व्हिडीओमध्ये त्यांनी कथ्थक प्रशिक्षक राधिका जोशी यांचं कौतुकही केलं आहे. 

टॅग्स :आदेश बांदेकरटिव्ही कलाकारअमेरिका