बिग बॉसच्या घरात भूत आत्मांचाही वावर,स्पर्धकांचीही उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 7:27 AM
वेळेआधीचं मरण किंवा अनैसर्गिक मृत्यूमुळं एखाद्याची आत्मा त्याची अतृप्त इच्छापूर्तीसाठी भटकते असते त्यामुळे अशाचा काही आत्माचा बिग बॉसच्या घरात ...
वेळेआधीचं मरण किंवा अनैसर्गिक मृत्यूमुळं एखाद्याची आत्मा त्याची अतृप्त इच्छापूर्तीसाठी भटकते असते त्यामुळे अशाचा काही आत्माचा बिग बॉसच्या घरात वावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.कोणी मानो अथवा न मानो.... भूतप्रेत...आत्मासारख्या शक्तींचा आपल्या अवतीभवती वावर असतो.... लहानपणापासूनच नेहमीच अशा गोष्टी ऐकत आणि पाहत आलोय...इतकंच नाही तर काहींना वाटतं की देव आहेत तर भूत-प्रेत आणि आत्मा याचंही अस्तित्व आहे.... असे आम्ही नाहीतर बिग बॉसच्या घरातील स्पर्धक या विषयावर चर्चा करताना दिसतायेत. बिग बॉसचा हा सेट लोणावळ्यामध्ये तयार करण्यात आला आहे. आजुबाजुला कोणतीही वस्ती नसून जंगल भागात हा सेट उभारलण्यात आला आहे.त्यामुळे बिग बॉसच्या घरात भूत आत्मांचाही वावर असू शकतो. याचे झालं असं की,कॉमनर्समध्ये शेजारी बनत एंट्री घेतलेली स्पर्धक मेहजबी सिद्दीकी अचानक मध्यरात्री एक टक मोठे डोळे करत अंधारात बसलेली दिसते.या भयानक अवस्थेत मेहजबीला बघताच अर्शी खानची बोबडी वळते आणि ती सगळ्या स्पर्धकांना उठवून मेहजबीला आत्माने पछाडले असे सांगते.इतर स्पर्धकांचाही मेहजबीला बघून थरकाप उडतो.या सगळ्यांमध्ये आकाश ददलानीची तर अवस्था अशी होते की,त्याची तर बोलतीच बंद होते. मेहजबीमुळे त्याची झोपच उडते.तो सतत मेहजबीला तु ठिक आहेस ना सतत विचारताना दिसतो.मात्र या सगळ्यांमध्ये हिना खान न घाबरता मेहजबी जवळ जाते आणि तिला शांत करत तिची काळजी घेताना दिसते. मेहजबीवर कोणी हसू नये या गोष्टींवर विश्वास होत नसला तरीही अशा गोष्टींचा वावर असतो असे हिना मानते. त्यामुळे हॉटेंड हाऊस बनत चालेले हे बिग बॉसचे घर आगामी काळात आणखी वेगवेगळ्या गोष्टी करत धमाल उ़डवून देणार हे मात्र नक्की. गेल्याच आठवड्यात विकेंड का वार या भागात सलमानने बाकी स्पर्धक काहीच करत नसून फुल आराम करण्यासाठी घरात आले असल्याचे म्हटले होते. काही निवडक स्पर्धकच वेगेवेगळ्या क्लृप्त्या लवढवत रसिकांचे मनोरंज करण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे बाकी स्पर्धकांनाही घरात त्यांचे अस्तित्व असल्याचे दाखवावे असे न केल्यास त्यांनाही लवकरच त्यांच्या घराचा रस्ता पकडावा लागेल असे म्हटले होते.त्यामुळे रसिकांचे लक्षवेधून घेण्यासाठी बेनपाशाहने केलेला हा खटोटोप तर नाही ना अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.