Join us

​बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या सपना चौधरीने का प्यायले होते विष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 5:00 AM

​बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या सपना चौधरीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

बिग बॉस ११ हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला असून या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. हितने तेजवानी, शिल्पा शिंदे, हिना खान यांसारख्या छोट्या पडद्यावरचे सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी असे आहेत. ज्यांना आपण ओळखत नसलो तरी ते त्यांच्या राज्यात खूपच फेमस आहेत. त्यातलीच एक स्पर्धक म्हणजे सपना चौधरी... सपना चौधरी ही दिल्ली, हरियाणा, युपी यांसारख्या उत्तरेकडील राज्यात प्रचंड फेमस आहे. ती एक डान्सर आणि सिंगर असून तिचे सगळेच डान्स लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. बिग बॉसच्या घरातील एक प्रसिद्ध सेलिब्रेटी तिला मानले जात आहे. तिच्या युट्युबवरील काही व्हिडिओंना तर लाखोहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सपना प्रचंड प्रसिद्ध असली तरी ती आजही स्वतःला एक सामान्य मुलगीच समजते. सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली. या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या. तिच्या बहिणीचे लग्न करून दिले. सपनाच्या सॉलिड बॉडी या पहिल्याच गाण्याने युट्युबला धुमाकूळ घातला होता. तिच्या पहिल्याच गाण्यामुळे ती फेमस झाली. आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की, एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कधीही पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते. सपनाने आयुष्यात प्रचंड स्ट्रगल केला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण सपनाने काही वर्षांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिने विष प्यायले होते. पण त्यातूनही ती वाचली. सपनाच्या या डान्स व्हिडिओला अनेक लाख व्ह्युज मिळाले आहेत. तुम्हीदेखील नक्कीच पाहा...Also Read : बिग बॉसमधील कॉन्ट्रोव्हर्शल स्पर्धक