Join us

श्रध्दा आर्यच्या लग्नाच्या दिवशी एकता कपूरने अशा प्रकारे दिल्या शुभेच्छा !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 7:00 PM

गेल्या 16 नोव्हेंबर रोजी श्रध्दाने एका खाजगी कार्यक्रमात राहुल नागलसह लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली.

‘कुंडली भाग्य’ मालिकेच्या कथानकाला अनेक कलाटण्या मिळाल्या आहेत. करण (धीरज धूपर) आणि प्रीताच्या (श्रध्दा आर्य) जीवनातील सततच्या नाट्यमय घटनांनी गेले काही महिने प्रेक्षकांमधील उत्कंठा वाढवून ठेवली आहे. मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना आतापर्यंत अनेक धक्के दिले असले, तरी त्यांच्या लाडक्या प्रीता ऊर्फ श्रध्दा आर्यच्या वास्तव जीवनातील एका घटनेने त्यांना धक्का बसला आहे. 

गेल्या 16 नोव्हेंबर रोजी श्रध्दाने एका खाजगी कार्यक्रमात राहुल नागलसह लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली. तिचे कुटुंबीय आणि जवळच्या मैत्रिणींना तिच्या या लग्नाची कल्पना होती, पण तिच्या लग्नाच्या बातमीने अनेकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. टीव्ही क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी श्रध्दाला तिच्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या, पण त्यातील निर्माती एकता कपूरने दिलेल्या शुभेच्छा मात्र अगदी अनोख्या होत्या.

श्रध्दाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. ‘कुंडली भाग्य’ची निर्माती असलेल्या एकता कपूरने श्रध्दाच्या रिसेप्शन सोहळ्याची काही फोटो शेअर करत या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.या मालिकेच्या शीर्षकाचा वापर करत खास शैलीत या शुभेच्छा दिल्या होत्या. लग्नाच्या काही दिवसांतच श्रद्धा आर्या पुन्हा एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी नववधू श्रद्धा आर्याच्या चेहऱ्यावरचा आनंदही झळकत होता. सध्या सोशल मीडियावर श्रद्धा आर्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

टॅग्स :एकता कपूर