यश आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) अकाली निधन झालं. गत 2 सप्टेंबरला हृदयविकाराच्या झटक्यानं त्याची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला आहे. कुटुंबीय व सिद्धार्थचा मित्रपरिवार अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सिद्धार्थची गर्लफ्रेन्ड मानली जाणारी शहनाज गिल (Shehnaz Gill) हिची अवस्था सर्वांत वाईट आहे. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या डोळ्यांतील अश्रू क्षणभरही थांबले नव्हते. तिला स्वत:ला सावरणं कठीण जात होतं. प्रेक्षकांनी सिद्धार्थ व शहनाजच्या जोडीवर प्रचंड प्रेम केलं. ‘सिडनाज’ नावानं ही जोडी ओळखली जात होती. साहजिकच सिद्धार्थ गेल्यानंतर चाहत्यांना शहनाजची चिंता सतावते आहे. अशात सिद्धार्थ गेल्यानंतर शहनाज ग्लुकोजवर आहे, या सोशल मीडियावरच्या चर्चेनं चाहत्यांची चिंता आणखीच वाढली आहे. शहनाज कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहे. तर आता तिच्याबद्दलची एक ताजी माहिती समोर आली आहे. होय, नुकताच शहनाजच्या एका फॅन पेजवर एका फॅनने एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे. हा स्क्रीनशॉट शहनाजची डिझायनर केन फर्न्ससोबतच्या चॅटचा आहे.
काय आहे चॅटती (शहनाज) ग्लुकोजवर आहे, असं लोक म्हणत आहेत. हे खरं आहे का? तुम्ही सर्व तिची काळजी घेत आहात, मला ठाऊक आहे. पण तरिही माझ्या सानूचं लक्ष ठेवा. तिची तब्येत ठीक असेल तर कृपा करून मॅसेजला उत्तर द्या, असं या चॅटमध्ये म्हटले आहे.या मॅसेजला उत्तर देत,शहनाजची डिझायनर केन हिनं ती ग्लुकोजवर नाहीये, हे स्पष्ट केलं आहे. हे पाहून साहजिकच शहनाजच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला दोन दिवस शहनाजने अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता. त्यामुळे तिला ग्लूकोज चढवावं लागलं होता.
‘बिग बॉस 13’च्या घरात सिद्धार्थ व शहनाजची रोमॅन्टिक केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडी होती. यानंतर या जोडीला ‘सिडनाज’ नावानं चाहते ओळखू लागले होते. सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या मैत्रीची सतत सोशल मीडियावर चर्चा होत असे. सिद्धार्थ व शहनाज लवकरच लग्न करणार होते, अशीही चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने शहनाजसोबत 'डान्स दिवाने ३' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शहनाजने सिद्धार्थसोबत केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सिद्धार्थने यावेळी माधुरी दीक्षितसोबतही स्टेजवर डान्स केला होता.