Join us

'नवरी मिळे हिटलरला' साठी कशी झाली वल्लरीची निवड, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 18:48 IST

Vallari viraj: वल्लरी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच नवरी मिळे हिटलरला ही नवीकोरी मालिका लवकरच छोट्या पडद्यावर प्रसारित होणार आहे. सध्या या मालिकेचे अनेक प्रोमो आणि व्हिडीओ समोर असून या मालिकेविषयी आणि त्यातील कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामध्येच या मालिकेतील लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी हिने तिच्या ऑडिशनचा किस्सा सांगितला आहे.

'नवरी मिळे हिटलर'ला या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता राकेश बापट मराठी मालिका विश्वात पदार्पण करत आहे. त्यामुळे या मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. राकेशसोबत या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज ही मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे या अभिनेत्रीविषयी चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

 " माझी लीलाच्या भूमिकेसाठी निवड एकदम अनपेक्षित होती. मला फोन आला आणि '२ दिवसात तू ऑडिशनला ये', असं सांगितले. मी जाऊन ऑडिशन दिलं आणि ३-४ दिवसात मला फोन आला की माझी निवड झाली आहे. मला वाटलं होत ऑडिशनचे अधिक राऊंड्स होतील. पण ते मला म्हणाले,  आम्हाला आणि चॅनेललाही तू लीला म्हणून पसंत आहेस. माझा विश्वास बसत नव्हता की पहिल्याच ऑडिशनमध्ये माझी निवड झाली आहे, असं वल्लरी विराज म्हणाली.

पुढे ती म्हणते, "लीलाबद्दल सांगायचं झालं तर ती बहिर्मुख आहे. तशीच माझ्यामध्ये ही  लवकर मित्र-मैत्रिणी बनवण्याची कला आहे. जिथे जाईन तिथे मिसळून जाते. पण  मला माझ्या जवळच्या लोकांमध्ये राहायला जास्त आवडतं".

दरम्यान, नवरी मिळे हिटलरला ही मालिका येत्या १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत वल्लरीसोबत राकेश बापट मुख्य भूमिका साकारत असून अभिराम असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारराकेश बापट