Join us

रामायण किंवा महाभारत नाही तर 'ही' होती भारतातील पहिली टीव्ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 5:48 PM

टेलिव्हिजन मालिका आज मनोरंजन विश्वाचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत.

टेलिव्हिजन मालिका आज मनोरंजन विश्वाचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. आताच्या मालिका सासू-सुनेच्या भोवताली फिरणाऱ्या आहेत  मात्र, जेव्हा मालिका सुरू झाल्या होत्या, तेव्हा नवीन कथा आणि नवीन उद्देश घेऊन भाग चालवले गेले होते. 80 च्या दशकात आलेल्या 'रामायण' आणि 'महाभारत' सारख्या पौराणिक मालिका तुम्ही बर्‍याच वेळा पाहिल्या असतील, पण तुम्ही भारतातील पहिली टीव्ही मालिका पाहिली आहे का? तर आज आम्ही तुम्हाला भारतातील पहिली मालिका कोणती होती, याबद्दल सांगणार आहोत. 

भारतातील पहिल्या टीव्ही मालिकेचे नाव 'हम लोग' असे होते. ज्याची निर्मिती ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते अशोक कुमार यांनी केली होती. ही मालिका 1984 मध्ये आली होती आणि तिचा शेवटचा भाग 17 डिसेंबर 1985 रोजी प्रसारित झाला होता. या मालिकेत सीमा पाहवा, मनोज पाहवा, दिव्या सेठ, सुषमा सेठ, राजेश पुरी, विनोद नागपाल, रेणुका इसरानी, ​​जयश्री अरोरा, आसिफ शेख आणि अभिनव चतुर्वेदी हे होते.

अशोक कुमार यांनी टीव्ही सीरियल्सचा पाया रचला आणि मग एक एक करून अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी मालिका बनवण्यात रस दाखवला. 'हम लोग' या मालिकेने तो काळ गाजवला. या मालिकेत सामाजिक संदेश तर होताच, शिवाय त्यामध्ये मनोरंजनही होते. या मालिकेत मध्यमवर्गीय कुटुंबातील समस्या चांगल्या प्रकारे दाखवण्यात आल्या होत्या. 

 'हम लोग' या मालिकेने केवळ भारतातच खळबळ उडवून दिली नाही. तर हा शो मॉरिशसमध्येही सुपरहिट ठरला. जर तुम्हाला ही मालिका पाहायची असेल तर तुम्ही ती YOUTUBE वर पाहू शकता. हा शो यूट्यूबवर उपलब्ध आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूडसेलिब्रिटी