छोट्या पडद्यावरील 'सोन्याची पावलं' ही मालिका रसिकांच्या चांगलीच पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेतले सर्वच कलाकार रसिकांच्या आवडीचे बनले आहेत. मालिकेला सुरुवातीपासून रसिकांची भरभरून पसंती मिळाली होती. दमदार कथानक आणि लोकप्रिय कलाकार यामुळे आजही रसिक मालिकेला खिळून आहेत. दिवसेंदिवस येणा-या ट्विस्टमुळे मालिका अधिकच रंजक बनत चालली आहे. मालिकेमुळे कलाकारांनाही वेगळीच ओळख मिळाली आहे. मालिकेतल्या कलाकारांचाही दिवसेंदिवस चाहता वर्ग वाढत आहे. कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो. सई देवधर या मालिकेत झळकत आहे. सई देवधरनेच या माालिकेची निर्मिती केली आहे.मालिकाच नाहीतर 'मोगरा फुलला' सिनेमात स्वप्नील जोशी सोबत सईने भूमिका साकारली होती.
सईने हिंदीमध्ये प्रसिद्ध असलेला शक्ती आनंदसोबत लग्न केले आहे.'अग्निपंख', 'देखा जायेगा', 'आय लव्ह देसी', 'अरशो' अशा अनेक सिनेमात त्याने भूमिका साकारल्या आहेत. तर ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’ , ‘संसार’, शु… कोई है’ , ‘कुसुम’, ‘डोली सजाके’, ‘आहट’, ‘संभव असंभव’, ‘ एक लाडकी अंजानी’ अशा २५ पेक्षा जास्त मालिकेत त्याने काम केले आहे.
एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान शक्ती आनंद आणि सई देवधर दोघांची ओळख झाली होती. एकत्र काम करता मैत्री झाली आणि तिथूनच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. दोघांच्या आवडी-निवडी जुळल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आज सुखाने त्यांचा संसार सुरु आहे. या कपलला एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव नक्षत्रा आनंद असे आहे.
सई देवधरने मराठीपेक्षा हिंदीमध्ये जास्त काम केले आहे. हिंदी मालिकाविश्वात तिने तिचे वेगळेच स्थान निर्माण केले आहे. मराठीतही काम करण्याची इच्छा असल्याचे तिने मध्यंतरी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. मराठीत कुणी कामच देत नाही. ‘मला माहित नाही ? यामागचं कारण काय ते. नाटक, सिनेमा किंवा मालिका, कुठेही ऑफर मिळाली तर मी काम करायला तयार आहे. हिंदीप्रमाणे मला मराठीत काम करायचं असल्याचे तिने सांगितले होते.