असे म्हटले जाते की यशस्वी लग्नाच्या रहस्याचे काही ठराविक नियम असत नाही. पण लोकप्रिय अभिनेता हुसेन कुंवजेरवाल त्याचे पार्टनरसह भांडण होवू नये यासाठी तो ती गोष्टीचे नित्यनियमाने पालन करतो. किचन चँपियनच्या सेटवर हुसेनने पत्नी टीनासह हजेरी लावली होती. यावेळी त्याचा जवळचा मित्र इक्बाल खानच्या विरूध्द हुसैन स्पर्धा करणार आहे, इक्बालला साथ देण्यासाठी त्याचीपत्नी स्नेहाही यावेळी उपस्थित होती.
हुसैन आणि टीना ही रोमँटिक जोडी एकत्र रहाते आहे. या दोघांचीकेमिस्ट्री पाहून होस्ट अर्जुन बिजलानीने कुतुहलाने हुसेनला त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनाचे रहस्य विचारले.यावेळी हुसेनने यामागचे रहस्य सांगताना तीन एस असे उत्तर दिले. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले.
अर्जुनला उत्तर देताना हुसेन म्हणाला की, “लग्न ही सुंदर संकल्पना आहे.यावर माझा विश्वास आहे. माझ्यासाठी आमच्या लग्नाचे यश तीन एस वर बेतेल आहे. ज्याचे मी नित्यनियमानेपालन करतो. ते म्हणजे 'सॉरी', ''सुन रहा हूँ ना बेबी'' आणि सायलेन्स. जेव्हा तुम्ही शिस्तीने याचे पालन करता तेव्हा तुमची बाजू व्यवस्थित रहाते. त्यामुळेच टीना आणि माझ्यात कधीही भांडणं होत नाही.”
'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'कुमकुम' मालिकेतून हुसैन घराघरात पोहचला. या भूमिकेतून त्याने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. कुमकुम मालिकेनंतर हुसैनने मालिकापासून काही काळ ब्रेक घेतला होता. 'सजन रे झूठ मत बोलो 2' मालिकेत त्याने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे.