​तारक मेहता का उल्टा चष्मामधील मिसेस हाथी म्हणजेच अंबिका रंजनकर प्रेक्षकांसोबत शेअर करणार हे सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 01:00 PM2016-12-19T13:00:54+5:302016-12-19T13:00:54+5:30

छोट्या पडद्यावरचे कलाकार आपल्या चित्रीकरणात नेहमी इतके व्यग्र असतात की त्यांना आपली एखादी आवड पूर्ण करण्यासाठी वेळच मिळत नाही. ...

I am going to share with Mitra Hathi, which means Ambika Ranjan in the glasses of Tarak Mehta's glasses. | ​तारक मेहता का उल्टा चष्मामधील मिसेस हाथी म्हणजेच अंबिका रंजनकर प्रेक्षकांसोबत शेअर करणार हे सिक्रेट

​तारक मेहता का उल्टा चष्मामधील मिसेस हाथी म्हणजेच अंबिका रंजनकर प्रेक्षकांसोबत शेअर करणार हे सिक्रेट

googlenewsNext
ट्या पडद्यावरचे कलाकार आपल्या चित्रीकरणात नेहमी इतके व्यग्र असतात की त्यांना आपली एखादी आवड पूर्ण करण्यासाठी वेळच मिळत नाही. पण काही कलाकार आपल्या शेड्युलमधून वेळ काढून आपल्या हॉबीसाठी खास वेळ देतात. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत मिसेस. हाथीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंबिका रंजनकर ही खूप चांगली कूक असल्याचे खूपच कमी जणांना माहिती आहे. ती नेहमीच काही ना काही तरी टेस्टी पदार्थ बनवत असते. तिला केक बनवायला तर खूप आवडतो. केकचे विविध प्रकारे ती बनवते. यंदा ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने ती अनेक केकची सिक्रेट रेसिपी तिच्या फॅन्ससोबत शेअर करणार आहे.
ख्रिसमस आणि नववर्षाला केक बनवायची इच्छा अनेकांना असते. पण त्याची योग्य पाककृती माहिती नसल्यास केक बिघडतो. पण यावर्षी तुम्हाला टेस्टी केक बनवायचा असल्यास अंबिक रंजनकर तुम्हाला मदत करणार आहे. अंबिकाच्या फेसबुक अकाऊंटवर मेसेज करून तुम्ही तिला केकच्या पाककृतीविषयी विचारू शकता. अंबिका तुम्हाला रेसिपी तर सांगेन. सोबत केक चांगला व्हावा यासाठी काही विशेष टिप्सदेखील देईल. याविषयी अंबिका सांगते, "मला जेवण बनवायला खूप आवडते आणि त्यातही केक बनवायला तर मला खूप आवडतो. चॉकलेट केक, ब्लॅक फॉरेस्ट केक, स्ट्रोबेरी केक असे केकचे विविध प्रकारे मी खूप चांगल्या प्रकारे बनवते. त्यामुळे माझ्या फॅन्सना केकची रेसिपी हवी असल्यास फेसबुकद्वारे मी त्यांच्यासोबत ती शेअर करणार आहे. यंदा मी माझ्या घरात ब्लॅक फॉरेस्ट केक बनवणार आहे. हा केक माझ्या नवऱ्याला आणि मुलाला खूपच आवडतो."



Web Title: I am going to share with Mitra Hathi, which means Ambika Ranjan in the glasses of Tarak Mehta's glasses.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.