Join us

सध्या मालिका आधुनिक बनत असल्याचा आनंद वाटतो - नीरा बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 8:30 PM

‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रणय, थरार आणि अमानवी शक्ती यासारख्या गोष्टींमुळे प्रेक्षकांना छोट्या पडद्याला खिळवून ठेवले आहे.

स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रणय, थरार आणि अमानवी शक्ती यासारख्या गोष्टींमुळे प्रेक्षकांना छोट्या पडद्याला खिळवून ठेवले आहे. ‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. या मालिकेत अनेक नामवंत कलाकार भूमिका साकारीत असून त्यात दिव्या या नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री नीरा बॅनर्जीहिचे टीव्ही क्षेत्राबद्दल वेगळे मत आहे.

आतापर्यंत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या नीरा बॅनर्जीने आता ‘दिव्य दृष्टी’ मालिकेद्वारे हिंदी टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. नीरा म्हणाली, “गेल्या काही वर्षांत भारतीय टीव्ही क्षेत्रात आधुनिकतेचे वारे वाहू लागल्याचे पाहून मला खूप आनंद वाटला. आताच्या मालिकांमध्ये भरजारी लेहेंगा किंवा साड्या परिधान कराव्या लागत नाहीत किंवा आजकालच्या मालिकांचे विषयही नेहमीच्या सासु-सुनेच्या कथेपेक्षा वेगळे असतात. आता या मालिकेतच पहा ना माझे कपडे हे आधुनिक आहेत, किंबहुना काहीसे फॅशनेबलही आहेत. दिव्या तर जीन्स, शॉर्टस, चित्रविचित्र टी-शर्टस वापरते आणि तिच्या कमरेला छोटा पाऊच बांधलेला असतो आणि तिची केशभूषा तर अगदीच आधुनिक असते. भारतीय टीव्हीवर आता पश्चिमात्य संस्कृती रुळत असल्याचे पाहून मला आनंद होतो. केवळकपडेच नव्हे, तर मालिकांच्य कथाही अधिक समकालीन आणि पटण्यायोग्य असतात.”भारतीय टीव्ही खरोखरच आधुनिक होत असून त्यातील कलाकारांना त्यांच्या मनाप्रमाणे कपडे करण्याचे बरेच स्वातंत्र्य दिले जात आहे आणि असे असूनही या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजनही करीत आहेत. ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत नाटयमयता, थरार आणि प्रणय यांचे सुंदर मिश्रण झाले आहे.

टॅग्स :स्टार प्लस