मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी( hemangi kavi). उत्तम अभिनयासह हेमांगी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती कायम काही ना काही नवीन पोस्ट शेअर करत असते. यावेळी तिने तिच्या आहाराविषयी आणि कोकणातील खाद्यसंस्कृतीविषयी भाष्य केलं आहे.
अलिकडेच हेमांगीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती कोळी महिलांच्या वेशात दिसत आहे. सोबतच तिने टाईमपास या चित्रपटातील ही पोळी साजूक तुपातली या गाण्यातील ओळी शेअर केल्या आहेत. त्याचसोबत या ओळींचा आणि तिच्या जीवनातील खाद्यसंस्कृतीत आलेला बदल यांच्यात कसं साम्य आहे हे सांगितलं आहे.
"ही पोळी साजूक तुपातली हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद! ☺️ लग्नाच्या आधी मी फार कमी, कमी म्हणजे नाहीतच जमा, मांसाहार करायचे, मधली ६ वर्ष तर मी अंड सुद्धा खाल्लं नव्हतं. इतकी vegetarian होते. पण मग पुढे लग्न झालं कोकणातल्या माणसासोबत आणि मग काय हळू हळू मांसाहार वाढत गेला. तेव्हा वरील ओळी चपखल आपल्यासाठीच लिहिल्या आहेत असं वाटतं! असं vegetarian to non- vegetarian कोण कोण झालंय सांगा पाहू? बरं ते जाऊदे... आज कालवणास काय केलंय ते सांगा!", अशी पोस्ट हेमांगीने लिहिली आहे.
दरम्यान, हेमांगी कवी कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर कमालाची सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. यात अनेकदा ती वैयक्तिक जीवनासह समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर तिचं उघडपणे मत व्यक्त करत असते. त्यामुळेच तिची ही पोस्टदेखील सध्या चर्चेत येत आहे.