मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) नेहमीच चर्चेत येत असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या मालिकेत जुई मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत तिने सायलीची भूमिका साकारली आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच तिने तिच्याबद्दल पसरवण्यात येणाऱ्या अफवांबद्दल भाष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी जुई गडकरीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे तिला मालिकेचे शूटींग करता येणार आहे, असेही म्हटले जात होते. मात्र आता तिने याबद्दल पोस्ट करत या सगळ्या अफवांवर सडेतोड भाष्य केले. ती म्हणाली की, १३ वा आठवडा नं १, Only and only grateful माय बाप रसिक प्रेक्षकांचे आभार!!!तुमच्या प्रेमाने मी भाराऊन गेलेय! बघत राहा “ठरलं तर मग!” सोम- शनि रा ८.३० वाजता स्टार प्रवाहवर. आणि हो, मी ठणठणित आहे! रोज शुट करत आहे! माझ्या accident मुळे मला ”गंभीर” दुखापत झाली आणि आता मला शुट करता येणार नाही असे व्हिडियोज सध्या फिरत आहेत! त्याकडे कृपया लक्ष देऊ नये!! M alright because of ur blessings and wishes!! ती पुढे म्हणाली की, तसं तर युट्युब वर माझी अनेकदा लग्नं पण झालियेत आणि मला दोन मुलं पण आहेत, माझे अमेरीकेत, दुबईत बंगले पण आहेत! या गोष्टींकडे लक्ष न दिलेलंच बरं!!! असो! तुम्ही मालिका बघताय ना???” अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे. या पोस्टमुळे जुईने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.