उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना या दोघांचे प्रेम ‘बिग बॉस’मध्ये बहरले. यानंतर बराच काळ दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक दोघांमध्ये ब्रेकअपची बातमी आली. पण पुन्हा दोघे अंधेरीच्या कुठल्याशा रेस्टॉरंटमध्ये मस्ती करताना दिसले. मग काय, आता दोघांमध्येही सगळे काही ठीक आहे, असे समजून सगळे जण आपआपल्या व्यापात गुंतले. पण नाही, असे नव्हतेच. उपेन आणि करिश्मा या दोघांमध्ये काहीही ठिक नाहीय. उपेनचे tweets बघता तरी असे वाटत नाही. त्याने तमन्नाबद्दलचा मनात असला नसला सगळा राग twitterच्या माध्यमातून ओकून टाकला आहे. कदाचित यावेळी करिश्माचा घाव उपेनच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतोय. तेव्हाच उपेनने एका पाठोपाठ एक असे अनेक tweets केलेत. या सगळ्या tweetsमध्ये तमन्नाबद्दल त्याच्या मनात असलेला राग स्पष्टपणे दिसतोय.‘ कुणी तरी तुम्हाला वापरले आणि मग फेकून दिले. तुमच्याशी खोटे बोलले, हे जाणून घेणे जगातील सगळ्यात वाईट फिलिंग आहे,’ असे एक tweet उपेनने केले आहे. यात उपेनने करिश्माला टॅग करत, तिला थँक्सही म्हटले आहे. ‘मरे हुए फूल को कभी पानी नहीं देना चाहिए,’ असे एका अन्य tweetमध्ये तो म्हणाला. तमन्नाकडे इशारा करणारे एकापाठोपाठ एक असे अनेक tweetsत्याने केले. शिवाय यापैकी काही डिलिटही केले.
उपेन व करिश्मा या दोघांनी २०१४ मध्ये ‘बिग बॉस’च्या आठव्या सीझनमध्ये भाग घेतला होता. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करणे सुरु केले होते. २०१५ मध्ये ‘नच बलिए7’च्या सेटवर उपेनने करिश्माला प्रपोज केले होते. यानंतर दोघांचा साखरपुडाही झाला होता. पण गतवर्षी अचानक दोघांच्या ब्रेकअपची खबर येऊन धडकली होती.