Join us

‘आजाराला कंटाळून मी केला होता आत्महत्येचा प्रयत्न’; शमा सिंकदरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 7:42 AM

अलीकडेच झालेल्या एक मुलाखतीमध्ये अभिनेत्री शमा सिकंदरने तिच्या आयुष्याशी निगडीत काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘जगामध्ये अशी कोणतीच ...

अलीकडेच झालेल्या एक मुलाखतीमध्ये अभिनेत्री शमा सिकंदरने तिच्या आयुष्याशी निगडीत काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जी प्रयत्नाशिवाय शक्य झाली आहे. मनोबल स्थिर आणि खंबीर असेल तर दुर्धर आजारावरही मात करता येऊ शकते’, हे अभिनेत्री शमा सिकंदर हिने दाखवून दिले आहे.छोट्या पडद्यावरील ‘ये मेरी लाईफ है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शमा सिकंदरने आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शमा गेल्या काही वर्षांपासून बायपोलर डिसॉर्डरने त्रस्त होती. या आजारपणाला कंटाळून शमाने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे. मुलाखतीत पुढे बोलताना ती म्हणते, ‘बायपोलर डिसॉर्डर’ या आजाराला मी अक्षरश: कंटाळले होते. माझ्या आजूबाजूला दु:ख, अंधार यांचं सावट पसरलं होतं. या साऱ्या  नकारात्मक गोष्टींमुळे नैराश्यात जाऊन मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दैव बलवत्तर असल्यामुळे मी मरणाच्या दारातून परत आले. त्यावेळी मला खऱ्या अर्थाने जगण्याचं महत्व कळलं आणि मी या आजाराशी दोन हात करत आज तुमच्या समोर उभी आहे,’ असं ती म्हणाली.शमा असेही म्हणाली की, ‘या आजारपणामुळे माझ्या जगण्याची उर्मी अधिक वाढली. त्यामुळे आता माझ्या आयुष्यात, करिअरमध्ये कोणतेही चढउतार आले तरी मला त्यांची भिती वाटत नाही. मी या नैराश्यातून बाहेर आले पण असे अनेक जण आहेत जे नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. त्या साऱ्यांपर्यंत मला पोहोचायचे आहे. त्यांना जीवनातील अंधारातून प्रकाशाच्या दिशेने घेऊन जायचं आहे. कदाचित माझा संघर्ष त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरु शकतो. बायपोलर डिसॉर्डरशी लढा देत शमाने पाच वषार्नंतर म्हणजे २०१६ मध्ये पुन्हा आपल्या करिअरला सुरुवात केली. आजारावर मात करणारी शमा सध्या तिच्या बोल्ड अंदाजासाठी सतत चर्चेत असते.