Join us

समाजाचा दृष्टिकोन बदलावा अशा आशयाचे लिखाण लिहीण्याची ऋत्विक अरोराची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:24 PM

तो शाळेत असताना अतिशय हुशार होता आणि त्याला वाचनाची अतिशय आवड होती.तरीही त्याने अभिनयाची आवड असल्यामुळे त्यातच करियर करायचे ठरविले.

ऋत्विक अरोरा छोट्या पडद्यावरील 'तू आशिकी' मधील आहान धनराजगीर म्हणून लोकप्रिय आहे. शो मधील त्याच्या रॉकस्टार इमेजने आणि पॉवरफुल परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 21 वर्षांचा ऋत्विक आज टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांमधील एक बनला आहे. तो शाळेत असताना अतिशय हुशार होता आणि त्याला वाचनाची अतिशय आवड होती.तरीही त्याने अभिनयाची आवड असल्यामुळे त्यातच करियर करायचे ठरविले.

शो मध्ये ऋत्विक एका रॉकस्टारची भूमिका साकारत असला तरी त्याला स्क्रिप्ट लेखक सुध्दा बनायची इच्छा आहे.त्याच्या छंदामध्ये लेखन हाही एक छंद आहे आणि शक्य असल्यास त्यातही करीयर करण्याची त्याची इच्छा आहे. लिहिलेल्या शब्दांना जास्त वजन असते यावर त्याचा विश्वास असल्यामुळे त्याच्या लिखाणा द्वारे त्याला समाजात बदल घडवून आणायचा आहे. त्याच्या लिखाणा मध्ये जास्त करून सामाजिक समस्या, सामाजिक विकास आणि मानवी मना संबंधित विषय असतात.

त्याच्या महत्वाकांक्षे विषयी बोलताना, ऋत्विक अरोराने सांगीतले,“ स्वतःला व्यक्त करण्याचे आणि समाजाची मानसिकता बदलण्याची आणि चांगल्या भविष्यासाठी काम करण्याचे लेखन हे अतिशय सशक्त माध्यम आहे यावर माझा विश्वास आहे. मला सामाजिक समस्या, परंपरा यासारख्या विषयांवर आणि समाजाच्या सध्याच्या वातावरणात दिसून येणारे मानवी मन याविषयी लिहायला आवडते. दोन पिढ्यांच्या विचारात असणारे अंतर मिटवणारा पूल बनणे आणि आमच्या विचार प्रक्रिया व वृत्ती मधील फरकामुळे तयार होणारी कोडी सोडविणे मला आवडेल.”