Join us

'रात्रीस खेळ चाले'मधील 'या' लोकप्रिय अभिनेत्याचा हिंदी मालिकेतून काढता पाय; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 7:37 PM

Adish vaidya : या अभिनेत्याने अवघ्या काही भागांचं चित्रीकरण केल्यानंतर या मालिकेला रामराम केल्याचं समोर आलं. त्यानंतर आता त्याने ही हिंदी मालिका का सोडली त्यामागचं कारण सांगितलं आहे. 

ठळक मुद्दे'रात्रीस खेळ चाले' (ratris khel chale) या मालिकेतील आर्चिस तुम्हाला आठवतोय का?

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. मराठीतील लोकप्रिय हॉरर मालिका म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. या मालिकेच्या कथानकासोबतच त्यातील काही भूमिका सुद्धा तुफान गाजला. त्यामुळेच या मालिकेतील अनेक कलाकारांचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर या कलाकारांच्या अभिनयाची दखल काही हिंदी निर्मात्यांनीही घेतली. त्यामुळेच या मालिकेतील एका अभिनेत्याने हिंदी मालिकेत झळकल्याचं दिसून आलं. मात्र, या अभिनेत्याने अवघ्या काही भागांचं चित्रीकरण केल्यानंतर या मालिकेला रामराम केल्याचं समोर आलं. त्यानंतर आता त्याने ही हिंदी मालिका का सोडली त्यामागचं कारण सांगितलं आहे. 

'रात्रीस खेळ चाले' (ratris khel chale) या मालिकेतील आर्चिस तुम्हाला आठवतोय का? माधव आणि निलिमाचा मुलगा म्हणजे आर्चिस. ही भूमिका अभिनेता आदिश वैद्य (adish vaidya) साकारत होता. मात्र, आदिशने  'गुम है किसी के प्यार में' (ghum hai kisikey pyaar meiin) या मालिकेसाठी रात्रीस खेळ चाले ही मालिका सोडली. मात्र, अवघ्या काही भागांमध्येच त्याने गुम है किसी के प्यार में या मालिकेला रामराम केला. त्यामागचं कारण त्याने सांगितलं आहे.

"ऑगस्ट महिन्यामध्ये ही मालिका सोडण्याचा मी निर्णय घेतला. त्यापूर्वी मी निर्मात्यांशी रितसर चर्चाही केली होती. परंतु, मालिकेत माझ्या वाट्याला आलेलं काम म्हणावं तितकं समाधानकारक नव्हतं. वर्षभर ही मालिका केल्यानंतरही माझ्या पात्रला हवं तितकं महत्त्व मिळत नव्हतं. त्यामुळे मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला", असं आदिश म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "माझ्या पात्राला पुरेसा स्क्रिन टाइम मिळेल याची मी वर्षभर वाट पाहिली. परंतु, तसं काहीच झालं नाही. त्यामुळे जवळपास दीड महिना नीट विचार केल्यानंतर मी गुम है किसी के प्यार में ही मालिका सोडली."

दरम्यान, 'बिग बॉस १५'साठी आदिश ही मालिका सोडत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीही नाही असं स्पष्टीकरण आदिशने दिलं आहे. आदिशने आतापर्यंत काही नाटकं, एकांकिका, मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमा