Join us

"मला एकटीला हॉटेलमध्ये बोलवलं होतं...", 'खिचडी' फेम अभिनेत्रीला करावा लागलेला कास्टिंग काउचचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:27 IST

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने कास्टिंग काउचचा सामना केला आहे आणि शेवटी तिने कंटाळून अभिनयाला रामराम केला आहे. आज ही अभिनेत्री एक यशस्वी बिझनेस वुमन बनली आहे.

बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. अनेकांनी कॅमेऱ्यासमोर येऊन इंडस्ट्रीची ही काळे बाजू सर्वांसमोर उघडकीस आणली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने कास्टिंग काउचचा सामना केला आहे आणि शेवटी तिने कंटाळून अभिनयाला रामराम केला आहे. आज ही अभिनेत्री एक यशस्वी बिझनेस वुमन बनली आहे.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी कोणी नसून ऋचा भद्रा (Richa Bhadra) आहे, जी हिट सिटकॉम खिचडीमध्ये चक्की पारेखच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली होती. बा बहू आणि बेबी और मिसेस सारख्या इतर मालिकांमध्येही ती दिसली होती. मात्र, ऋचा अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. एका मुलाखतीत ऋचाने अभिनयाला अलविदा करण्यामागचे कारण सांगितले होते.

ऋचाने टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी एका कास्टिंग डिरेक्टरला भेटले, त्याने सांगितले की, मला आनंदी ठेव, मी तुला काम देईन' असे सांगून तिला तडजोड करण्यास सांगितले होते. जेव्हा मी कॉफी शॉपमध्ये भेटण्याचा सल्ला दिला तेव्हा त्याला मला एका हॉटेलमध्ये भेटायचे होते. इंडस्ट्रीतील माझ्या सर्व आकांक्षांचा हा शेवट होता. बाल कलाकार म्हणून मी जी इमेज तयार केली होती ती मला खराब करायची नव्हती."

ऋचाने अभिनय सोडण्याचे हेही एक कारण होतेऋचाने अभिनय सोडण्यामागचे आणखी एक कारण सांगितले होते आणि म्हणाली, मी नेहमीच एक जाड मुलगी राहिली आहे. मी मोठी होत असताना, मला अशा भूमिका दिल्या जात होत्या ज्यात मला ऑनस्क्रीन एक्सपोज किंवा रोमान्स करायचा होता. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी मला माझ्या कुटुंबाच्या किंवा माझ्या इच्छेविरुद्ध अशा भूमिका करायच्या नव्हत्या."

ऋचा भद्रा आहे यशस्वी बिझनेस वुमनऋचाने आता अभिनय सोडून एक यशस्वी बिझनेसवुमन बनली आहे. तिचे मुंबईत २० सलून आहेत आणि आता ती तिचा व्यवसाय इतर शहरांमध्येही वाढवण्याचा विचार करत आहे.