Join us

तब्बल 19 वर्षानंतर अमिताभ बच्चन यांच्या KBC शोमध्ये करण्यात येणार हा मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 12:22 PM

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी.

पुन्हा रंगणार गप्पांची मैफल आणि पुन्हा कुणी तरी सामान्यातील सामान्य बनणार करोडपती. कारण लवकरच कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीचं नवं पर्व रसिकांच्या भेटीला येणार आहे. बिग बींचा अनोखा अंदाज, शोमध्ये येणारे स्पर्धक, त्यांच्या बिग बींचा संवाद, शोमधून समोर येणा-या विविध भावनिक गोष्टी यामुळे केबीसीचे सगळेच पर्व टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. केबीसीपुढे इतर रियालिटी शोची जादू फिकी पडली.

 इतकंच नाही तर अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. महानायक आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव केबीसीशी नाव जोडलं गेलं. त्यामुळे या केबीसीला एक परिमाण लाभलं होतं. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. 19 ऑगस्टपासून कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीचं नवं पर्व रसिकांच्या भेटीला येणार आहे.विशेष म्हणजे यंदा या सिझनसाठी एक मोठा बदल करण्यात येणार आहे. ते म्हणजे केबीसी या शोची आइकॉनिक ट्यून. अजय-अतुल यांनी केबीसीची नवीन ट्युन बनवली  आहे. 

याविषयी अजय-अतुल यांनी सांगितले की, ‘कौन बनेगा करोडपती’ सारखा खास शो बरोबर जोडले जाणे हा आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. जेव्हा केबीसी ट्युनसाठी आमच्याकडे संपर्क साधला गेला, तेव्हा आमच्यासमोर यामध्ये आम्ही काय करू शकू हा प्रश्न नव्हता, तर लाखो लोकांच्या मनावर कोरल्या गेलेल्या ट्युनवर आम्ही कितपत झेप घेऊ शकू हा होता. पण या ट्युनमध्ये नवीन रंगत आणणारी सुरावट – ज्यामध्ये वृंदावनाच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी असलेले वाद्यसंगीत वापरण्यात आम्ही यशस्वी झालो आणि ते आधीपेक्षा जास्त उत्कृष्ट वाटत आहे याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही आशा करतो की ही रचनादेखील मूळ रचनेसारखीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. 

 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन