Join us

आदर्श गाणार पहिल्यांदा छोटया पडदयावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2016 2:47 PM

सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना छोटया पडदयाची भुरळ पडलेली दिसत आहेत. अभिनेता रितेश देशमुख, स्वप्नील जोशी, आदिनाथ कोठारे, तेजस्विनी पंडित ...

सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना छोटया पडदयाची भुरळ पडलेली दिसत आहेत. अभिनेता रितेश देशमुख, स्वप्नील जोशी, आदिनाथ कोठारे, तेजस्विनी पंडित यांसारखे कलाकारांनी छोटया पडदयावर आपल्या अभिनयाची जादू निर्माण केलेली आहे. आता चित्रपटसृष्टीतील या कलाकारांच्या पाठोपाठ गायकांनादेखील छोटया पडदयाची क्रेझ निर्माण झालेली दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, झी युवा वाहिनीवर शौर्य - गाथा अभिमानाची हा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा सांगणारा असणार आहे. या कार्यक्रमातील एका अ‍ॅन्थम सॉन्गचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या अ‍ॅन्थम सॉन्गला गायक आदर्श शिंदे याने स्वरबद्द केले आहे. तर संगीत दिग्दर्शन अमित राज यांनी केले आहे. आदर्शचे छोटया पडद्यावरील हे पहिलेच गाणे असल्याचे त्यांने लोकमत सीएनएक्सला सांगितले. आदर्श सांगतो, छोटया पदडयावर गाणं गाण्याची संधीची वाट खूप दिवसांपासून पाहत होतो. अखेर शौर्य - गाथा अभिमानाची या कार्यक्रमाने ही संधी मिळाली. त्यामुळे छोटया पडदयावर गाणे गायल्यामुळे खूपच आनंद होत आहे. कारण चित्रपटाच्या माध्यमातून फक्त मर्यादित प्रेक्षकांपर्यतच पोहोचता येते. मात्र छोटया पडदयावरून घराघरात पोहोचता येते. त्यामुळे हीच खरी मजा असते. तसेच हे गीत अतिशय प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर या गाण्याचे संगीत सुद्धा तेवढेच प्रभावी आणि यूथफूल असल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले. हा कार्यक्रम २५ नोव्हेंबरपासून सुरु होणर आहे. तसेच हा कार्यक्रम दर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९ वाजता वेगवेगळ्या गाजलेल्या शौर्य कथांसह प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.