Join us

'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर काय केलं असतं? मधुराणी म्हणाली- "मी मुंबईत..."

By देवेंद्र जाधव | Updated: February 23, 2025 12:57 IST

'आई कुठे काय करते' मालिका जर मिळाली नसती तर मधुराणीने काय काम केलं असतं, यावर तिने मौन सोडलंय

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अरुंधतीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. दोन महिन्यांपूर्वी 'आई कुठे काय करते' मालिका संपली असली तरीही एक स्त्री म्हणून मालिकेतील अरुंधतीचा प्रवास पाहणं हा सर्वांसाठी एक प्रेरणादायी अनुभव. ज्या मालिकेमुळे मधुराणीला (madhurani prabhulkar) ओळख मिळाली ती 'आई कुठे काय करते' मालिका मिळालीच नसती, तर काय केलं असतं याविषयी मधुराणीने तिचं मत व्यक्त केलंय.

'आई कुठे काय करते' मालिका मिळाली नसती तर?

सौमित्र पोटेंच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मधुराणीला हा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, "आई कुठे काय करते मालिका मिळाली नसती तर मी मुंबईत शिफ्ट झाले असते आणि वेबसीरिजसाठी प्रयत्न केले असते. पण निश्चतच मी काम करत राहिले असते. मालिकेआधी मी पुण्यात प्रायोगिक रंगभूमीवर काम करत होते. रंगपंढरी आणि कवितेचं पान सारखे उपक्रम मी केले." अशाप्रकारे मधुराणीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

मधुराणीचं वर्कफ्रंटमधुराणीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'आई कुठे काय करते' मालिकेनंतर तिने सध्या ब्रेक घेतलाय. सलग पाच वर्ष मधुराणीने या मालिकेचं शूटिंग केलं. त्यामुळे 'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मधुराणी सध्या कुटुंबाकडे आणि मुलीकडे लक्ष देत आहे. याशिवाय सध्या ती आगामी विविध प्रोजेक्ट्समध्ये काम करते आहे. काहीच दिवसांपूर्वी 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेत मधुराणी पुन्हा एकदा अरुंधतीच्या रुपात भेटायला आली.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजन