सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’ या पुरोगामी कथेमध्ये सुम्बुल तौकीर खान ही गुणी अभिनेत्री काव्याच्या प्रमुख भूमिकेत आहे. ही मालिका म्हणजे सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या दृढनिश्चयी आयएएस ऑफिसरचा प्रवास आहे. आयएएस ऑफिसर होण्याच्या उद्देशाने प्रेरित झालेली काव्या, कठोर निर्णय घेताना डगमगत नाही आणि कसोटीच्या समयी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काम करते. सध्या चालू असलेल्या कथानकामध्ये, प्रेक्षकांना वेदनादायक भूतकाळाच्या छायेत झाकोळलेले बसंत खेडी हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याचे कठीण काम काव्या निर्भयपणे पार पाडताना दिसणार आहे. नव्या या आपल्या दिवंगत बहिणीच्या कथित निष्काळजीपणामुळे बंद पडलेल्या हॉस्पिटलशी निगडीत आठवणी असूनही, काव्या हे नुकसान भरून काढण्यासाठी कटिबद्ध आहे. तथापि, तिचा मार्गदर्शक जयदीप तिला बसंत खेडी उपक्रमातून काढून टाकत तिच्या मार्गात आणखी अडचणी उभ्या करतो. आणि त्यात आणखी भर म्हणून तिचा एकमात्र विश्वासू, आदिराज प्रधान देखील तिचा विश्वासघात करत आहे, असे तिला वाटते. आदिराजचे वडील आणि राजकारणी गिरीराज प्रधान हॉस्पिटलच्या जमिनीवर कब्जा करण्याचा कट रचून काव्याला आव्हान देतील. परंतु ज्वलंत प्रश्न उरतोच: संकटांचा सामना करून काव्या विजयी होईल? या वेगवान आणि मनोरंजक मालिकेच्या आगामी भागांमध्ये याची उत्तरे आहेत.
"उद्देश उदात्त असेल तर विजय तुमचाच होतो...",'काव्या...' मालिकेच्या निमित्ताने सुम्बुल तौकीरनं व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 7:26 PM