Join us

'बरोबरी करायला जमलं नाही तर बदनामी सुरु केली'; व्हायरल MMS वर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 6:27 PM

Anjali arora: व्हायरल होत असलेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

'कच्चा बदाम' या गाण्यामुळे रातोरात सुपरस्टार झालेली 'लॉकअप' कंटेस्टंट म्हणजे अंजली अरोरा (anjali arora). सध्या अंजली एका व्हायरल MMS मुळे चर्चेत येत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी अंजली असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. मात्र, अफवांवर आता अंजलीने तिचं मौन तोडलं आहे. व्हायरल होत असलेल्या MMS च्या चर्चांवर अंजलीने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या तिच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये MMS मध्ये दिसत असलेली मुलगी मी नाही. तसंच काही जण केवळ माझ्या बदनामीसाठी हे करत असल्याचं तिने म्हटलं आहे.

"ज्यांच्यासोबत बरोबरी करता येत नाही ना त्यावेळी अशी बदनामी सुरु करतात लोक. त्या लोकांना जे करायचंय ते करु देत", असं अंजली या व्हिडीओमध्ये म्हणते.

दरम्यान, अंजलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक एमएमएस व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी अंजली असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात ती अंजली नसून अन्य दुसरी मुलगी आहे.  

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार