Join us

'कॉन्स्टेबल मंजू'मध्ये तात्या साहेबांच्या दहीहंडीने घेतलं अनपेक्षित वळण, मंजूच्या धाडसाने प्रेक्षकांना केलं थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 19:14 IST

Constable Manju Serial : 'कॉन्स्टेबल मंजू'मध्ये दहीहंडीचा सोहळा रंगणार आहे. या दहीहंडीचा विशेष भाग प्रेक्षकांसाठी एक रोमांचक असणार आहे.

सन मराठी वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान केले. या मालिकेत भित्री भागुबाई मंजू आणि बिनधास्त, बेधडक सत्या या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दरम्यान आता सर्वत्र दहीहंडीची धामधूम पाहायला मिळत आहे. तसेच लोकप्रिय मालिका 'कॉन्स्टेबल मंजू'मध्ये दहीहंडीचा सोहळा रंगणार आहे. या दहीहंडीचा विशेष भाग प्रेक्षकांसाठी एक रोमांचक असणार आहे.

'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत दहीहंडी सोहळ्यात मंजू, जी साधारणपणे तिच्या नेभळट स्वभावासाठी ओळखली जाते, ती पहिल्यांदाच  गुंडांना सामोरे जाते. हा संपूर्ण भाग बाहेर शूट केला गेला आहे. या तुफानी भागात एका खऱ्या दही हंडी गटाचा समावेश असून ज्यामध्ये सत्याही हंडीच्या थरावर चढून हंडी फोडतो. इतक्यात मंजूवर हल्ला होतो.

हा धक्कादायक प्रसंग प्रेक्षकांना नक्कीच भावुक करणारा आहे, जो या कथेतल्या खोल नात्यांचे आणि तीव्र नाट्याचे प्रदर्शन करून देणार आहे. अगदी आनंदाने भरलेला दहीहंडीचा उत्सव, हा एका क्षणात गंभीर होतो.या विशेष भागात असणारा आशय प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. आता मंजू जगणार की मरणार असा पेच निर्माण होतो